सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  

 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका, सोने- चांदीच्या दरवाढीचा भडका, सोन्याचे दर 7372 रुपयांनी वाढले
  • नागपूर स्फोट प्रकरण : निष्काळजीपणाची प्राथमिक नोंद; मृतांच्या कुटुंबीयांना ८२ लाखांची मदत जाहीर – चंद्रशेखर बावनकुळे
  • अमेरिका अन् इराण युद्धाचा फटका, जळगावातील केळी उत्पादक शेतकरी चिंतेत
  • इस्रायल-अमेरिका-इराण तणावाचा जागतिक बाजारांवर परिणाम; सेन्सेक्स 80 हजारांखाली, निफ्टीतही मोठी घसरण
  • मोठी बातमी! पुण्यातील कॉलेजचे 80 विद्यार्थी दुबईत अडकले; पालक चिंतेत, शैक्षणिक सहलीनिमित्तच दौरा
  • मोठी बातमी! महायुतीचं मुंबईकरांना मोठं गिफ्ट; मालमत्ता करात तब्बल 700 स्क्वेअर फूटापर्यंत करमाफी
 जिल्हा

नागपूर स्फोट प्रकरण : निष्काळजीपणाची प्राथमिक नोंद; मृतांच्या कुटुंबीयांना ८२ लाखांची मदत जाहीर – चंद्रशेखर बावनकुळे

डिजिटल पुणे    02-03-2026 17:46:34

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे काल (1 मार्च 2026) सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये आतापर्यंत 19 कामगार मृत्युमुखी पडले असून 23 जण जखमी आहे. जखमींपैकी 13 जण गंभीररित्या जखमी असून ते 70% पेक्षा जास्त भाजले आहेत.आज बैठकीत निर्णय झाले की पेसोचे अधिकारी, डिशचे अधिकारी आणि कामगार आयुक्त या विभागांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. या सर्वांनी गेल्या वर्षभरात करावे तसे काम केले नाही. विभागीय आयुक्त आणि पोलिस अधीक्षक त्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई शिफारस करतील. त्यानंतर या अधिकाऱ्यांवर ( पेसो, डिश, कामगार विभाग) गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल. सोबतच, घटना कशामुळे झाली याचा प्राथमिक रिपोर्ट आला आहे. त्यात ही घटना निष्काळजीपणामुळे झाल्याचे समोर आलं आहे. अशी महत्वपूर्ण माहिती भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.ए

महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज घेतलेल्या बैठकीनंतर प्राथमिक चौकशी अहवालात स्फोट निष्काळजीपणामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगितले. अंतिम अहवाल एका महिन्यात सादर केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित होणार

या प्रकरणात पेसो, डिश आणि कामगार आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरातील तपासण्या आणि देखरेखीबाबत त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल. विभागीय आयुक्त आणि पोलिस अधीक्षक या संदर्भात कारवाईची शिफारस करणार आहेत.

मृतांच्या कुटुंबीयांना ८२ लाखांची मदत

स्फोटात मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना एकूण ८२ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यात कंपनीकडून ७५ लाख रुपये, राज्य सरकारकडून ५ लाख रुपये आणि केंद्र सरकारकडून २ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच जखमींना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष योजना आखण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

कंपनी बंद असताना वेतन सुरू राहणार

स्फोटानंतर कंपनी तात्पुरती बंद ठेवण्यात आली असून, ती पुन्हा सुरू होईपर्यंत कामगारांना वेतन दिले जाईल, अशी माहिती देण्यात आली. कंपनी सुरू झाल्यानंतर कामगारांना कौशल्यविकास प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. काही कामगारांना आवश्यक प्रशिक्षण न दिल्याची बाबही समोर आली आहे.

डीएनए तपासणी व पुढील कारवाई

मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अंतिम अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मंत्री बावनकुळे यांनी दिला. “अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधात कारवाई का करू नये?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 Give Feedback

 जाहिराती