सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका, सोने- चांदीच्या दरवाढीचा भडका, सोन्याचे दर 7372 रुपयांनी वाढले
  • नागपूर स्फोट प्रकरण : निष्काळजीपणाची प्राथमिक नोंद; मृतांच्या कुटुंबीयांना ८२ लाखांची मदत जाहीर – चंद्रशेखर बावनकुळे
  • अमेरिका अन् इराण युद्धाचा फटका, जळगावातील केळी उत्पादक शेतकरी चिंतेत
  • इस्रायल-अमेरिका-इराण तणावाचा जागतिक बाजारांवर परिणाम; सेन्सेक्स 80 हजारांखाली, निफ्टीतही मोठी घसरण
  • मोठी बातमी! पुण्यातील कॉलेजचे 80 विद्यार्थी दुबईत अडकले; पालक चिंतेत, शैक्षणिक सहलीनिमित्तच दौरा
  • मोठी बातमी! महायुतीचं मुंबईकरांना मोठं गिफ्ट; मालमत्ता करात तब्बल 700 स्क्वेअर फूटापर्यंत करमाफी
 DIGITAL PUNE NEWS

भारती विद्यापीठात कोड फ्युजन स्पर्धेत विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी

डिजिटल पुणे    02-03-2026 18:28:18

पुणे :  भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे आयईईई स्टुडंट ब्रांच आणि गीक्स फॉर गीक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोड फ्युजन ही कोडिंग स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या क्षेत्रात विद्यार्थिनींना स्पर्धात्मक प्रोग्रामिंगचा अनुभव मिळावा आणि त्यांच्या तांत्रिक कौशल्यांना योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी साडेनऊ वाजता महाविद्यालयाच्या संगणक केंद्रात स्पर्धेला प्रारंभ झाला. नव्वद मिनिटांच्या कालावधीत चार प्रश्न देण्यात आले. प्रश्नांची पातळी स्पर्धात्मक प्रोग्रामिंगच्या धर्तीवर ठेवण्यात आली होती. त्यामुळे तार्किक विचारशक्ती अल्गोरिदमिक विश्लेषण आणि वेळेचे प्रभावी नियोजन यांची कसोटी लागली.

द्वितीय आणि तृतीय वर्षातील विविध शाखांमधील एकूण पंचवीस विद्यार्थिनींनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. विद्यार्थिनींनी एकाग्रतेने आणि आत्मविश्वासाने प्रश्न सोडवत आपल्या कोडिंग कौशल्यांचे प्रभावी प्रदर्शन केले. या उपक्रमामुळे महाविद्यालयात आरोग्यदायी स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले.

स्पर्धेचा निकाल जाहीर करताना प्रथम क्रमांक नेहल जोगड द्वितीय वर्ष माहिती तंत्रज्ञान यांनी मिळविला. द्वितीय क्रमांक सिद्धी शेवजवाल द्वितीय वर्ष संगणक अभियांत्रिकी यांनी पटकाविला. विजेत्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.यावेळी प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी सांगितले की अशा तांत्रिक स्पर्धांमुळे विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या उद्योग क्षेत्रातील स्पर्धेसाठी सक्षम बनतात. 

कार्यक्रमास उपप्राचार्या डॉ. सुवर्णा चोरगे, उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार आणि डॉ. विजया पवार उपस्थित होते. आयईईई स्टुडंट ब्रांच कौन्सेलर डॉ. श्वेता साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी यशस्वीरीत्या पार पडली.आयईईई स्टुडंट ब्रांच बीव्हीसीओईडब्ल्यू पुणे यांच्या वतीने भविष्यातही विद्यार्थिनींच्या कौशल्यविकासाला चालना देणारे आणि उद्योगाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


 Give Feedback



 जाहिराती