सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इस्रायलची गुप्त नजर, सीसीटीव्ही ते मोबाईल नेटवर्कवर पकड; अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा
 शहर

स्माईल संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा; संघर्षातून यश मिळविणाऱ्या महिलांचा झाला सत्कार

डिजिटल पुणे    09-03-2026 10:48:49

पुणे : महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी गेली पंचवीस वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या स्माईल अर्थात सावित्री मार्केटिंग इन्स्टिट्यूट फॉर लेडीज एम्पॉवरमेंट या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम आज डॉ. नीतू मांडके आयएमए सभागृह , टिळक रस्ता येथे उत्साहात पार पडला. जागतिक महिला दिनाच्या पूर्वदिनी आयोजित या कार्यक्रमात स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला.या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्षा आणि माजी राज्यसभा सदस्य अ‍ॅड. वंदना चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुणे पालिकेचे मुख्य  समाजविकास अधिकारी रामदास चव्हाण, पुण्यभूषण फौंडेशनचे संस्थापक डॉ.सतीश देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे,ज्येष्ठ पत्रकार अभय कुलकर्णी, स्माईल तसेच  स्फूर्ती फाऊंडेशनच्या विश्वस्त वृषाली दाभोळकर,एड.दिव्या चव्हाण, माजी नगरसेविका मीनल सरवदे या मान्यवरांच्या हस्ते 'स्फूर्ती' या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. उमा नटराजन,साक्षी कुंबरे,रवी चौधरी,वृषसेन दाभोळकर,सुधीर शिंदे,श्रीराम टेकाळे  यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमात संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. स्माईलच्या उपक्रमातून मार्गदर्शन घेऊन विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांचा तसेच स्माईल उत्पादनांची उल्लेखनीय विक्री करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. स्त्री शक्ती पुरस्कार, अढळ स्त्री शक्ती पुरस्कार आणि संघर्षशील स्त्री शक्ती पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी अनेक यशस्वी महिलांचा गौरव करण्यात आला.स्त्री सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मंदा शिंपी आणि कल्पना इंदूरकर यांना ‘आजीवन योगदान स्त्री शक्ती पुरस्कार’ प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सक्षम होऊन व्यवसायात यशस्वी झालेल्या तृतीयपंथींचाही या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.विडीकामगारांच्या मुलींनी आणि विविध महिला समूहांच्या नृत्यांना चांगली दाद मिळाली.

शशिकला कुंभार, नंदिता खैरे, डॉ वैजयंती नगरकर, मृणालिनी वाणी,पद्मा कांबळे, रत्ना नाईक,उर्मिला गायकवाड,अनुराधा कळसेकर,राजश्री भंडारी, प्रगती, मानिनी गुर्जर,शीतल कुंभार अशा अनेक महिलांचा सत्कार करण्यात आला. वृषाली दाभोळकर,संजीवनी जोगळेकर ,नीता गलांडे यांनी सूत्रसंचालन केले.

*महिलांमुळे झालेले समाजातील परिवर्तन आनंददायी : एड.वंदना चव्हाण*

‘एड.वंदना चव्हाण यांनी संस्थेच्या स्थापनेमागची महिला साक्षरता,सक्षमीकरणाची भूमिका सांगितली.महिला,युवक वर्गासाठी,तृतीयपंथियांसाठी  केलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या,'२५ वर्षे विश्वासाची, २५ वर्षे सामर्थ्याची’ या संकल्पनेतून संस्थेच्या वाटचालीचा उत्सव साजरा करण्यात आला. स्त्रीशक्तीवरील विश्वासातून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे हजारो महिलांच्या आयुष्यात आत्मविश्वास, स्वावलंबन आणि एकजुटीची भावना निर्माण झाली . महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा आणि संधी देण्याचे कार्य स्माईल संस्थेमार्फत सातत्याने सुरू राहील, असेही त्यांनी नमूद केले.रौप्यमहोत्सवी वर्ष हा सन्मान, स्वावलंबन आणि एकजुटीच्या बळावर उभ्या राहिलेल्या प्रत्येक स्त्रीला समर्पित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

ज्येष्ठ पत्रकार अभय कुलकर्णी म्हणाले,' स्माइल संस्थेने महिला सक्षमीकरण करताना समाजातील दोन वर्गाना जोडण्याचे काम केले. यापुढे त्यांनी महिलांमधील डिजिटल एडिक्शन समस्येवर  काम करावे.'राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले, 'अनेक संस्था स्थापन होतात. पण कार्यरत राहून, टिकून राहून समाजात परिवर्तन घडवणारे काम वंदना चव्हाण यांनी केले. स्वतःची वेगळी ओळख वंदना चव्हाण यांनी पुण्यात, राज्यात,देशात निर्माण केली. राजकीय, आर्थिक फायद्या -तोट्याचा विचार त्यांनी केला नाही.


 Give Feedback



 जाहिराती