पुणे – जागतिक महिला दिनानिमित्त वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड येथील कर संकलन इमारत (दुसरा मजला), भैरवनाथ मंदिराजवळ या ठिकाणी शासकीय योजना माहिती शिबिर व मोफत आरोग्य व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात भाग जनसेविका सौ. नयन चव्हाण यांनी अनुलोम संस्थेची सविस्तर माहिती देत महिलांना विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले. आयोजित आरोग्य शिबिरात सांधेदुखी, गुडघेदुखी तसेच इतर सामान्य आजारांची तपासणी करण्यात आली. उपस्थित महिलांची जनरल तपासणी करून त्यांना आवश्यक ते औषध व गोळ्या मोफत देण्यात आल्या. या शिबिरामध्ये एकूण ५२ महिलांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून डॉ. नितीन झोगडे (संयोगी संस्था समन्वयक, कात्रज भाग) उपस्थित होते. त्यांनी विविध आजारांबाबत मार्गदर्शन करत कमी खर्चात बाळासाहेब देवरस हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासण्या उपलब्ध असल्याची माहिती दिली.तसेच बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटरचे प्रशासन अधिकारी श्री. संदीप मुकुंद हरसुले यांनीही कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य केले. उपस्थित नर्स यांनी महिलांची तपासणी करून योग्य उपचार दिले.
या कार्यक्रमाला अनुलोमचे कार्यकर्ते व मित्रमैत्रिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये सौ. स्वाती रायकर (वडगाव), सौ. भाग्यश्री पुणेकर (कात्रज), सौ. मीनाताई शेळके (शिवणे), सौ. अश्विनी गिरी (उत्तम नगर), सौ. सायली भोसले (कोंडवे धावडे), श्री. दिलीप रायकर (रायकर मळा, धायरी) आणि श्री. तानाजी कांबळे (नऱ्हे) यांचा समावेश होता.या उपक्रमामुळे महिलांना आरोग्य तपासणीबरोबरच विविध शासकीय योजनांची उपयुक्त माहिती मिळाली.