पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त व्हिएमजेएस, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले योगनिद्रा शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शिबिरात डॉ. मेघा देऊसकर (प्रोफेसर, एफ.सी. कॉलेज) यांनी योगनिद्रेचे महत्त्व, त्यामागील शास्त्रीय व अध्यात्मिक पैलू अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला हिमानी रायचूर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला वर्षा कुगांवकर यांनी प्रस्तावना करत मान्यवरांचा सत्कार केला. त्यानंतर हिमानी रायचूर यांनी डॉ. मेघा देऊसकर यांचा परिचय करून दिला. पुढे डॉ. देऊसकर यांनी योगनिद्रा प्रक्रियेचे मार्गदर्शन करत शिबिराला सुरुवात केली.




अतिशय शांत व मंत्रमुग्ध वातावरणात सर्व सहभागी महिलांनी योगनिद्रेचा अनुभव घेतला. सुमारे ४० मिनिटांचा कालावधी कसा गेला हे कळलेच नाही, अशी प्रतिक्रिया अनेक महिलांनी व्यक्त केली. शिबिरानंतर सहभागी महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत हा अनुभव अतिशय सकारात्मक व उपयुक्त ठरल्याचे सांगितले.

या शिबिरात वर्षा कुगांवकर, भाग्यश्री चौथाई, उज्वला किन्नरी, पद्मजा कुलकर्णी, वैशाली मिटकरी, स्वरूपा कमानेस्वामी, शिल्पा जंगम, विद्या भस्मारे, वंदना गुपचूप, पूनम हिरोळी, अनिता स्वामी, सुनंदा दहितुले, सुनिता दिवटे, अश्विनी स्वामी, साधना वनपत्रे, वैभवी वनपत्रे, रूपाली कमाने, अंजू हिरेमठ, अनुराधा नवनी आदींनी सहभाग नोंदविला.तसेच सुभाष हिरेमठ, पराग जंगम, शिवलिंग जंगम आणि महेश कुगांवकर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वंदना गुपचूप यांनी केले. कार्यक्रमासाठी पूर्वतयारी व्ही.पी. ग्रुपच्या स्टाफने केली.

