सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
  • मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
  • राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
 शहर

इंग्रजी नाट्यकलाकृती'फिनिक्स' चे सादरीकरण १४ मार्च रोजी

डिजिटल पुणे    09-03-2026 17:29:34

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत फिनिक्स या इंग्रजी नाट्यकलाकृतीचे(दीर्घांक)सादरीकरण शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता  आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.

लेखिका अरुणा ठोसर-दीक्षित लिखित या नाटकाचे दिग्दर्शन मोहन माडगुळकर यांनी केले आहे. या नाटकात मोहन माडगुळकर,राधिका माडगुळकर, प्रमिती  नरके, अंगद पटवर्धन, लक्ष्मी बिराजदार, सचिन पंडित आणि हर्षवर्धन श्रोत्री हे कलाकार भूमिका साकारत आहेत.मोहन माडगुळकर दिग्दर्शित फिनिक्स या इंग्रजी नाटकाचा मुख्य विषय मानवी नातेसंबंध, भावनिक ताणतणाव आणि जीवनात पुन्हा उभे राहण्याची क्षमता याभोवती फिरतो.पुरुष प्रधान संस्कृतीचा स्त्रियांच्या महत्वाकांक्षांवर होणारा परिणाम, लग्न झाल्यानंतर रक्ताच्या नात्यांचा बदलता दृष्टिकोन, पुरोगामी विचाराच्या स्त्रियांच्यादेखील त्यांच्या जोडीदारांनी ‘पुरुष’ म्हणून कसे असले पाहिजे याबद्दलच्या कल्पना, इत्यादी विषयांना स्पर्श करणारे ‘फिनिक्स’  प्रेक्षकांना अंतर्मुख करणार आणि आत्मपरीक्षण करण्यास भाग पडणारा नाट्यानुभव देते.  

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत सादर होणारा हा २८५ वा  कार्यक्रम आहे.  सर्व रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.


 Give Feedback



 जाहिराती