सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इराण-इस्रायल संघर्षाचा भारतावर परिणाम; इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘ECA’ कायदा लागू केला
  • महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘Come Early, Go Early’ योजना; सुनेत्रा पवारांची विधिमंडळात मोठी घोषणा
  • गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुण्यातील हॉटेल बंद होण्याची शक्यता; नोकरदार, विद्यार्थी अन् नागरिकांची तारांबळ
  • ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
  • विश्वविजेत्या टीम इंडियाचा मुंबईत पुन्हा भव्य रोड शो; तारीखही आली समोर, BCCI लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
 जिल्हा

अचलपूरमध्ये अमृत योजनेअंतर्गत क्रॉस लाईन कनेक्शनचे काम सुरू – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

डिजिटल पुणे    10-03-2026 18:07:03

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिका क्षेत्रात अमृत योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी पुरवठा प्रकल्पाची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तपासणी करण्यात आली असून प्रकल्पात कोणतीही अनियमितता आढळलेली नाही. मात्र काही भागात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी आवश्यक असलेली क्रॉस लाईन कनेक्शनची कामे नगरपरिषदेकडून सुरू आहेत, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिका क्षेत्रात २०१८-२०१९ मध्ये अमृत योजनेंतर्गत सुमारे २२ कोटी रुपये खर्च करूनही नागरिकांना नळाद्वारे नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचा मुद्दा सदस्य प्रविण तायडे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, अचलपूर नगरपालिका क्षेत्रात २०१८-२०१९ मध्ये अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा प्रकल्प राबविण्यात आला असून तो २०१९ मध्ये पूर्ण झाला आहे. त्यावेळी झालेल्या सर्वेक्षणात काही ठिकाणी क्रॉस लाईन कनेक्शन राहिले होते. त्यामुळे नगरपरिषद स्वतःच्या खर्चातून ही कामे करत आहे.आतापर्यंत सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले असून ४७ ठिकाणी क्रॉस लाईन कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक भागांतील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. उर्वरित कामही नगरपरिषदेमार्फत सुरू असून संपूर्ण योजनेचे हायड्रॉलिक टेस्टिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित भागातही पाणी पुरवठा सुरळीत होईल, असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती