पुणे: रुपीनगर येथील १३ वर्षीय ध्रुविता चव्हाण हिने क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर ध्रुविताने अवघ्या १३ व्या वर्षी तब्बल १२ वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये यश संपादन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, धैर्य आणि लढाऊ वृत्तीपासून प्रेरणा घेत ती सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
ध्रुविताने तालुका, जिल्हा परिषद (ZP), विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत अनेक पदके जिंकली आहेत. जिल्हा परिषद स्तरावर कुराश, युनिफाईट आणि शस्त्रांगण मार्शल आर्ट्समध्ये प्रथम क्रमांक मिळवला, तर बेल्ट रेसलिंग, जूडो, आष्टेदू आखाडा, शूटिंग बॉल, लंगडी आणि टग ऑफ वॉरमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. थाई बॉक्सिंग आणि डॉजबॉलमध्ये तृतीय क्रमांक मिळवूनही तिने आपली क्षमता दाखवून दिली.
विभागीय स्तरावर युनिफाईटमध्ये प्रथम आणि कुराशमध्ये तृतीय क्रमांक मिळवत तिने राज्य स्तरावरही युनिफाईटमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरही युनिफाईटमध्ये प्रथम क्रमांक मिळवत तिने उल्लेखनीय यश संपादन केले.
सोलो क्रीडा प्रकारांबरोबरच ध्रुविताने रग्बी, कॅरम, शूटिंग बॉल, टेनिक्वेट, लंगडी, टग ऑफ वॉर, कराटे आणि डॉजबॉल अशा अनेक सांघिक खेळांमध्येही सहभाग घेतला आहे. ती शिवकालीन युद्धकला देखील शिकत असून तिला आठ प्रकारची शस्त्रे हाताळता येतात.
ध्रुविता सध्या मोरेवस्ती येथील श्रीगणेश व्यायाम मंडळ येथे प्रशिक्षण घेत असून तिचे प्रशिक्षक प्रफुल्ल प्रधान आहेत. ती सेंट पिटर्स स्कूलची विद्यार्थिनी आहे. सिद्धार्थ फाउंडेशन, पुणे संस्थेची विद्यार्थिनी असलेल्या ध्रुविताने आंतरराष्ट्रीय ऑनलाइन अबॅकस स्पर्धेत “Champion of Champion” हा किताब जिंकून देशाचे नावही उंचावले आहे.परिवार आणि प्रशिक्षकांच्या भक्कम पाठिंब्यामुळे ध्रुविताचा क्रीडाप्रवास अधिक उज्ज्वल होत असून तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
ध्रुविताची उल्लेखनीय क्रीडा कामगिरी
ध्रुविताने विविध क्रीडाप्रकारांमध्ये तालुका, जिल्हा परिषद (Z.P), विभागीय, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धांमध्ये सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
- जिल्हा परिषद (Z.P) स्तर
प्रथम क्रमांक: कुराश, युनिफाईट, शस्त्रांगण मार्शल आर्ट्स
द्वितीय क्रमांक: बेल्ट रेसलिंग, जूडो, आष्टेदू आखाडा, शूटिंग बॉल, लंगडी, टग ऑफ वॉर
तृतीय क्रमांक: थाई बॉक्सिंग, डॉजबॉल
- विभागीय / झोनल स्तर
प्रथम क्रमांक: युनिफाईट
तृतीय क्रमांक: कुराश
- राज्य स्तर
प्रथम क्रमांक: युनिफाईट
- राष्ट्रीय स्तर
प्रथम क्रमांक: युनिफाईट
सांघिक क्रीडा प्रकारांमधील सहभाग
वरील सोलो क्रीडा प्रकारांसोबतच ध्रुविताने अनेक सांघिक खेळांमध्येही तितक्याच जिद्दीने सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिने खालील क्रीडा प्रकारांमध्ये आपली प्रतिभा दाखवली आहे – रग्बी, कॅरम, शूटिंग बॉल, टेनिक्वेट, लंगडी, टग ऑफ वॉर, कराटे, डॉजबॉल इत्यादी.
“शारीरिक ताकद लढाई जिंकते, पण मानसिक दृढता विजयाला अजरामर करते.”
ती शिवकालिन युद्धकला शिकते. तिला ८ वेग वेगल्या शस्त्र चालवायला येतो.
या विचाराचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ध्रुविता चव्हाण.
प्रशिक्षण व पाठिंबा
अकॅडमी: श्रीगणेश व्यायाम मंडळ, मोरेवस्ती
शाळा: सेंट पिटर्स स्कूल
प्रशिक्षक: प्रफुल्ल प्रधान