पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील कु. श्रावणी संजय मोरे या विद्यार्थिनीला भारतीय मानक ब्युरो (BIS) आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन क्विझ कॉम्पिटिशन, प्लायवूड आणि इलेक्ट्रॉनिक्स अलोंग विथ द स्टॅंडर्ड वॉच २६ व २७ एपिसोड' या विषयावर आधारित झालेल्या ऑनलाइन क्विझ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. तिला सात हजार पाचशे रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. बीआयएस मेंटोंर प्रीती राठौड यांच्या मार्गदर्शनाखाली यश प्राप्त झाले आहे.
या यशाबद्दल श्रावणी मोरे हिचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य गजाला सय्यद तसेच महाविद्यालयातील सर्व अध्यापकांनी अभिनंदन केले.