सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
  • केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात; 29 वर्षांपूर्वीच्या दुखापतीमुळे ऑपरेशनची वेळ, पैलवान खासदाराला महिनाभर सक्तीची विश्रांती
 शहर

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; जुनी दुखापत बळावल्याने महिनाभर विश्रांती

डिजिटल पुणे    14-03-2026 16:03:48

पुणे : पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आज पुण्यातील एका खासगी रुग्णालयात गुडघ्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास २९ वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना झालेल्या दुखापतीचा त्रास पुन्हा वाढल्याने डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्यांना किमान एक महिन्याची सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

माहितीनुसार, कुस्ती खेळताना कोल्हापूरमधील तालमीत मोहोळ यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्या दुखापतीमुळे त्यांना पुढे कुस्ती सोडावी लागली. अनेक वर्षे त्यांनी या त्रासाकडे दुर्लक्ष केले; मात्र अलीकडे प्रवास आणि वाढलेल्या कामाच्या ताणामुळे गुडघ्याचा त्रास पुन्हा वाढू लागला. त्यामुळे अखेर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच ही शस्त्रक्रिया करावी लागल्याची खंत मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. देशभरातील प्रवास, पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद तसेच आगामी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीसारखी अनेक कामे प्रलंबित असल्याने त्यांना कामात खंड पडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

शस्त्रक्रियेनंतर पुढील सात ते आठ दिवस ते रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार असून त्यानंतर घरी विश्रांती घेणार आहेत. लवकरच पूर्णपणे बरे होऊन पुन्हा जोमाने जनतेच्या सेवेत हजर होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी पुण्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती