सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
  • अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
  • केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात; 29 वर्षांपूर्वीच्या दुखापतीमुळे ऑपरेशनची वेळ, पैलवान खासदाराला महिनाभर सक्तीची विश्रांती
 शहर

पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रसंग! लिफ्टच्या दरवाज्यात चिमुकलीचा हात अडकला; नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

डिजिटल पुणे    14-03-2026 18:16:51

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीत लिफ्ट वापरताना घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. काही महिन्यांच्या चिमुकलीचा हात लिफ्टच्या दरवाज्यात अडकला होता. सुदैवाने उपस्थित नागरिकांच्या तत्परतेमुळे काही मिनिटांतच चिमुकलीचा हात सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला आणि मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला आपल्या लहान बाळासोबत सोसायटीतील लिफ्टने वरच्या मजल्यावर जात होती. लिफ्ट ठरलेल्या मजल्यावर थांबल्यानंतर दरवाजा उघडला आणि पुन्हा बंद होऊ लागला. याच वेळी चिमुकलीने निष्काळजीपणे आपला हात दरवाजावर ठेवला आणि दरवाजा बंद होत असताना तिचा हात त्यात अडकला.

ही बाब लक्षात येताच लिफ्टमध्ये असलेल्या महिलेसह आजूबाजूच्या नागरिकांची धावपळ उडाली. चिमुकली वेदनेने रडत असताना तिला बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले. काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर तिचा हात सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.

ही घटना 7 मार्च रोजी घडली असून सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रसंग कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या घटनेनंतर लिफ्टचा वापर करताना विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तसेच पालकांनीही मुलांना लिफ्टजवळ एकटे सोडू नये आणि दरवाज्यांपासून दूर ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती