सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
  • अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
  • केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात; 29 वर्षांपूर्वीच्या दुखापतीमुळे ऑपरेशनची वेळ, पैलवान खासदाराला महिनाभर सक्तीची विश्रांती
 DIGITAL PUNE NEWS

*अंतरराष्ट्रीय पाय दिन उत्साहात साजरा*

MSK    15-03-2026 17:06:16

*अंतरराष्ट्रीय पाय दिन उत्साहात साजरा*

अंतरराष्ट्रीय पाय दिनानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील गणित विभागात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गणित विषयाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित करणारी नाटिका, गाणे तसेच नृत्य सादर केले. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठस्तरीय ‘अविष्कार’ स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचाही प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी गणित विभागप्रमुख डॉ. सुजाता टापरे यांनी ‘पाय’ या गणितीय स्थिरांकाचे अनन्यसाधारण महत्त्व विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले.

या कार्यक्रमात गणित विभागातील प्रा. सिद्धेश्वर, प्रा. झुरंगे, प्रा. आदलिंग, प्रा. कोकाटे, प्रा. दिवटे, प्रा. पाचपुंड, प्रा. बोबडे आणि प्रा. कणगे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला.


 Give Feedback



 जाहिराती