सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • संकट काळात भारतानं शेजारधर्म पाळला! अडचणीत असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात, तब्बल 40 हजार टन इंधनाचा पुरवठा करणार
  • गॅस टंचाईनंतर आता बेरोजगारीची लाट, आखाती देशांमधील हजारो भारतीय कामगारांच्या नोकऱ्या जाणार, घरी परतण्यासाठी विमानाचे पैसेही नाहीत
 विश्लेषण

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न.....

डिजिटल पुणे    16-03-2026 10:44:36

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्राचार्या डॉ शर्मिला चौधरी, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नितीन शिंदे, सचिव ब्रह्मानंद पुजारी, गोरख दगडे, सागर येवले आदी संघटनेचे सदस्य उपस्थित होते. जुन्या आठवणींना उजाळा देत संवाद सेतू साधण्यासाठी जीवनातील महत्वपूर्ण टप्पे गाठल्यानंतर आपले महाविद्यालयीन विश्व पुन्हा एकदा अनुभवण्याची आणि स्नेहांकिताच्या गाठी दृढ करण्याची सुवर्ण संधी  माजी विद्यार्थ्यांना मिळाली. हा स्नेह मेळावा एक औपचारिक कार्यक्रम नव्हता तर माजी विद्यार्थ्यांसाठी एक भावनिक व्यासपीठ ठरले आहे.

महाविद्यालय जीवनातील गोड आठवणी कट्यावरील गप्पा आणि आयुष्याच्या प्रवासातील अनुभव कथन करण्यासाठी या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले होते. अनेक वर्षांनी भेटणाऱ्या वर्ग मित्र, मैत्रिणी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातील संवाद अधिक प्रगल्भ व अर्थपूर्ण झाला तसेच महाविद्यालयाच्या जडणघडणीत माजी विद्यार्थ्याचा सहभाग वाढवणे  व वर्तमान विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाचा लाभ मिळवून देऊ असे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मत व्यक्त करण्यात आले यामुळे हा मेळावा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

या निमित्ताने सर्व जुन्या प्राध्यापकांचा, आदर सत्कार करण्याची आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधीही माजी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. यावेळी नितीन शिंदे, ब्रह्मानंद पुजारी, सागर येवले, गोरख दगडे, ऐश्वर्या रावडे, किसन कुंभार, राहुल मोरे, सोनल साठे, विकी कांबळे, विनय शर्मा, माधव टोपे, देविदास तांबे, नेहरूनिसा शेख, वर्षा काळे, द्रोण चव्हाण, मनोज शिर्के, अमित निकाळजे, महेश काळे आदी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आपले महाविद्याल्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच काही निवडक माजी विद्यार्थी यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ शर्मिला चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी समन्वय समिती प्रमुख डॉ. अशोक शेळके, डॉ योगेश पवार, डॉ स्वाती शिंदे, प्रा गौरी मारणे, प्रा मनीषा खंडाळे, प्रा प्राजक्ता मगर, प्रा कृष्णा शिंदे, कार्यालय प्रमुख आशिष परमार, नितीन भोसले, संजू कुंभार, सर्व विभागांचे प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती