सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा इशारा; गुढीपाडव्याच्या सुमारास पावसाची शक्यता, विदर्भात गारपिटीचा धोका
  • दहशतवादी स्थळ सांगून पाकिस्तानकडून रुग्णालयावर एअरस्ट्राईक; 400 जणांनी गमावला जीव, अफगाणिस्तान हादरलं
 शहर

शिक्षण ,व्यावसायिक क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचा सन्मान; भारती विद्यापीठ पूना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये कार्यक्रम

डिजिटल पुणे    17-03-2026 10:14:54

पुणे : भारती विद्यापीठ, पूना कॉलेज ऑफ फार्मसी(एरंडवणे), 'पीसीपी सखी' यांच्या वतीने १४ मार्च २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम शिक्षण व व्यावसायिक क्षेत्रातील महिलांच्या यशस्वी योगदानाचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.मुख्य अतिथी म्हणून श्रीमती स्वप्नाली कदम,अध्यक्ष, भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्स, पुणे या उपस्थित होत्या.

या कार्यक्रमास  पूना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. आत्माराम पवार, उपप्राचार्य डॉ. वर्षा पोखरकर, भारती पीसीपी सखीच्या मुख्य समन्वयक व उपप्राचार्य डॉ. एल. सथियनारायणन उपस्थित होते. कार्यक्रमात  कर्तुत्ववान माजी विद्यार्थिनींना सन्मानित करण्यात आले. श्रीमती सविता दातीर, सहाय्यक आयुक्त, FDA पुणे आणि श्रीमती सीमा सामंत, उपाध्यक्ष, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज यांचा औषध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सत्कार करण्यात आला. तसेच, भारती विद्यापीठाच्या आयक्यूएसी संचालक डॉ. किर्ती गुप्ता यांचा शैक्षणिक व प्रशासकीय मौल्यवान योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय, महाविद्यालयातील अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.डॉ. मुग्धा सूर्यवंशी यांनी आभार मानले.

स्वप्नाली कदम यांनी भाषणात महिलांच्या शिक्षणाचे, नेतृत्व क्षमतेचे आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी महिलांना व विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्यास, व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यास आणि आरोग्य व औषधनिर्माण क्षेत्रात सक्रिय योगदान देण्यास प्रोत्साहित केले. तसेच, महिलांना सशक्त बनवणे हे कुटुंब आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा स्त्री आणि पुरुष यांना समान संधी मिळते, तेव्हाच समाजाचा सर्वांगीण विकास होतो असा  विचार त्यांनी मांडला.


 Give Feedback



 जाहिराती