सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा इशारा; गुढीपाडव्याच्या सुमारास पावसाची शक्यता, विदर्भात गारपिटीचा धोका
  • दहशतवादी स्थळ सांगून पाकिस्तानकडून रुग्णालयावर एअरस्ट्राईक; 400 जणांनी गमावला जीव, अफगाणिस्तान हादरलं
 शहर

२२ मार्च रोजी पुण्यात राज्यस्तरीय काव्य संमेलन

डिजिटल पुणे    18-03-2026 12:52:23

पुणे :  ज्ञानज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, मांजरी हडपसर पुणे आणि संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य ओतूर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कवीसंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानज्योत फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त तसेच श्रीराम पुंजाजी भरणे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त हा विशेष सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमात “बाबा” या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार असून  रविवार दि.२२ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत हा कार्यक्रम  वेदशास्त्रोतेजक सभागृह, सणस क्रीडा मैदानासमोर, सदाशिव पेठ, पुणे येथे होणार आहे.
 
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष  श्रीपाल सबनीस व सौ. ललिता सबनीस हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन एस.एम.जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन चे विश्वस्त अॅड. संतोष म्हस्के यांच्या हस्ते होणार  आहे.
पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण समारंभ  आरोग्य सेनेचे  राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजीत वैद्य यांच्या हस्ते होणार आहे.  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते  विशाल ओव्हाळ हे उपस्थित राहणार आहेत.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डॉ. शिवाजी गायकवाड  करणार आहेत. आयोजनाची जबाबदारी ज्ञानज्योत फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. कविता काळे, संस्थापक कार्याध्यक्ष  रणजित पवार आणि संस्थापक कार्याध्यक्षा सौ. कांचन मून , रघुनाथ कांबळे, संयोजक संदीप सातपुते , सहसचिव प्रा. रेखा फाले यांनी स्वीकारली आहे.
 
पुरस्कार वितरण:
 
या कार्यक्रमात विविध मान्यवरांना त्यांच्या योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.त्यात लक्ष्मण शिंदे , राहुल निकम , वीणा कडू ,वनीता चौधरी , दादासाहेब सोनावणे ,सौ मिनल हर्णे , अस्मिता मेश्राम " पुष्पांजली " यांचा समावेश आहे.


 News Feedback

Digital Pune
Kanchan Moon
 18-03-2026 14:36:01

Nice Thanks

 Give Feedback



 जाहिराती