सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिका आता इराणमध्ये सैन्य पाठवणार? डोनाल्ड ट्रम्प स्पष्टच बोलले, युरोपीय देशांवर संताप व्यक्त
  • अवकाळी पावसाचा राज्यभर तडाखा; गारपीट-विजांच्या कडकडाटाने पिकांचे मोठे नुकसान
  • थेट अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानावर संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या! सुरक्षेसाठी तातडीची बैठक बोलावली; दोन्ही नेत्यांच्या शिफ्टिंगचा विचार
 विश्लेषण

इराणमध्ये सैन्य पाठवणार नाही; पण गरज पडल्यास कारवाई शक्य – डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा, युरोपवरही टीका

डिजिटल पुणे    20-03-2026 16:33:06

अमेरिका : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट करत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. इराणमध्ये अमेरिकन सैन्य तैनात करण्याचा कोणताही सध्याचा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले, मात्र परिस्थिती गंभीर झाल्यास अमेरिका आवश्यक ती पावले उचलू शकते, असेही संकेत दिले.

१९ मार्च २०२६ रोजी दिलेल्या प्रतिक्रियेत ट्रम्प यांनी इराणच्या लष्करी क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, इराणची नौदल आणि वायुसेना मोठ्या प्रमाणात कमजोर झाली असून, संरक्षण यंत्रणाही प्रभावी राहिलेली नाही. त्यामुळे अमेरिकेला आवश्यक तेथे कारवाई करणे शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सैन्य पाठवण्याबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका अशा निर्णयांची पूर्वघोषणा करत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष तैनातीबाबत त्यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.

दरम्यान, इराणमधील महत्त्वाच्या तेल निर्यात केंद्रांपैकी एक असलेल्या खर्ग बेट संदर्भातही त्यांनी वक्तव्य केले. हे ठिकाण पूर्णपणे असुरक्षित असून, गरज पडल्यास तेथील नियंत्रण सहज मिळवता येऊ शकते, असा इशाराच त्यांनी दिला.याचवेळी ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी संवाद झाल्याचे सांगितले. ऊर्जा क्षेत्रांवर हल्ले टाळावेत, असा सल्ला त्यांनी इस्रायलला दिल्याचेही स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी जपानच्या भूमिकेचे कौतुक केले, तर युरोपीय देशांवर नाराजी व्यक्त केली. विशेषतः NATO देश अपेक्षित सहकार्य करत नसल्याची टीका त्यांनी केली. तसेच होर्मुझची सामुद्रधुनी परिसराच्या सुरक्षेबाबत युरोप निष्क्रिय असल्याचा आरोपही त्यांनी केला.दरम्यान, पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये ऊर्जा संकट अधिक तीव्र होऊ शकते.


 Give Feedback



 जाहिराती