सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिका आता इराणमध्ये सैन्य पाठवणार? डोनाल्ड ट्रम्प स्पष्टच बोलले, युरोपीय देशांवर संताप व्यक्त
  • अवकाळी पावसाचा राज्यभर तडाखा; गारपीट-विजांच्या कडकडाटाने पिकांचे मोठे नुकसान
  • थेट अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानावर संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या! सुरक्षेसाठी तातडीची बैठक बोलावली; दोन्ही नेत्यांच्या शिफ्टिंगचा विचार
 शहर

पुणे शहर पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा २२ मार्चला; २० हजारांहून अधिक उमेदवार पात्र

डिजिटल पुणे    20-03-2026 18:08:01

पुणे : पुणे शहर पोलीस यांच्या शिपाई भरती २०२४-२५ प्रक्रियेअंतर्गत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दि. १६ फेब्रुवारी २०२४ ते १२ मार्च २०२४ या कालावधीत अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी पूर्ण करण्यात आली होती.

या मैदानी चाचणीत ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या उमेदवारांमधून एकूण २०,०६९ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. ही लेखी परीक्षा दि. २२ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

उमेदवारांनी परीक्षेला येताना महा-आयटीकडून मिळालेलं मैदानी चाचणी प्रवेशपत्र, लेखी परीक्षेचं प्रवेशपत्र आणि चार पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे बंधनकारक आहे. तसेच परीक्षेच्या वेळेच्या तीन तास आधी म्हणजे सकाळी ८ वाजता केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.परीक्षा केंद्रावर पिण्याचे पाणी, रायटिंग पॅड आणि पेन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.


 Give Feedback



 जाहिराती