सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या; भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणावर उद्धव ठाकरेंचं परखड भाष्य, मुख्यमंत्र्यांनाही आवाहन
  • मोठी बातमी : सुनेत्रा पवारांची रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर पहिली ॲक्शन, कारवाईला सुरुवात
  • महाराष्ट्रावर 'अवकाळी' संकट, गारपीट अन् पावसाच्या तडाख्यानं उभी पिकं झाली आडवी; पाहणीसाठी गेलेल्या मंत्री आशिष शेलारांपुढं बळीराजाला रडू कोसळलं
  • इराण कडवा प्रतिकार अन् अवघ्या जगाची कोंडी केलेला स्ट्रेट ऑफ होर्मुझ काही केल्या सुरु होईना; आता ट्रम्प यांनी दबावतंत्रासाठी नवीन चाल शोधली!
 जिल्हा

माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे हस्ते आधार संच वितरण

डिजिटल पुणे    21-03-2026 12:26:41

सोलापूर :  सध्याच्या संगणकाच्या युगात आधार ही मूलभूत ओळख असून आधार क्रमांकाविना कोणतेही शासकीय कामकाज होत नाही. यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने सुधारित सॉफ्टवेअर तयार करून आधार केंद्रांना अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून अद्यावत आधार संच तयार करण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीने  आधार संच वितरण कार्यक्रम शुक्रवार पेठ येथे ठेवण्यात आला होता. यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात पाच आधार केंद्रांना आधार संचचे वितरण करण्यात आले.

मंत्री ॲड. शेलार यांनी पुढे सांगितले की, शासनाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून १००० सेवा थेट नागरिकांच्या व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील १३१ आधार केंद्रांपैकी १०६ किट वितरित झाले असून, प्रतिनिधिक स्वरूपात पाच किट आज देण्यात आले. उर्वरित २५ किट एप्रिल-मे महिन्यात वितरित करण्यात येणार आहेत.उत्तर तहसीलदार निलेश पाटील यांनी आधार संचाबद्दल माहिती देऊन सांगितले की, या किटमुळे आधार नोंदणी करताना कमीत कमी अडचणी येतील आणि कामकाज अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.या कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शहाजी पवार, मोहन डांगरे, तहसीलदार निलेश पाटील तसेच इतर पदाधिकारी, आधार केंद्र चालक व कर्मचारी उपस्थित होते.

 


 Give Feedback



 जाहिराती