पुणे/आळंदी: पिंपरी-चिंचवडच्या दिघी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. प्रसिद्ध गायक चंदन अदिनाथ कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी एका ४६ वर्षीय महिलेवर केवळ अत्याचारच केला नाही, तर तिला शॉक देऊन वेडे ठरवण्याचा आणि तिची मालमत्ता बळकावण्याचा क्रूर कट रचल्याचे समोर आले आहे.



अंधश्रद्धा आणि कुप्रथेचा वापर
पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, आरोपींनी तिला अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढले. पीडितेचे देवाशी लग्न लावून देण्याच्या बहाण्याने तिला फसवण्यात आले आणि आरोपी राजू राजपूत याच्याशी तिचे लग्न लावून दिले. या नावाखाली पीडितेचा अमानवीय छळ करण्यात आला. पीडिता एका भयानक कुप्रथेची शिकार झाली असून, तिच्यावर जादूटोणा आणि अघोरी कृत्यांचा वापर करून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे.

