नागपूर : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समाज सेवेला प्राधान्य देऊन लोकसेवक म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाने सुरू झालेल्या नव्या आरोग्य सेवेचा शुभारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, या सेवा प्रकल्पातून सर्वसामान्य जनतेला परवडतील अशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.सोमलवाडा परिसरात श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन तर्फे अत्याधुनिक सुविधायुक्त गंगाधरराव फडणवीस डायग्नोसिस सेंटर उभारण्यात आले असून या सेवेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता, सर्वसामान्यांना अत्याधुनिक सुविधांचा लाभ परवडेल अशा दरात उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
लोकार्पण सोहळ्यास सरिता गंगाधर फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अर्थ व नियोजन मंत्री ॲङ आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे खासदार मायाताई मनाते जीवनाते लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डायग्नोसिस सेंटरला गंगाधरराव फडणवीस यांचे नाव दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अतिशय आधुनिक अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देताना सर्व सामान्यांना या सेवाचा लाभ घेता यावा हा प्रमुख उद्देश आहे. त्याच्यामुळे जो काही खर्च येतो तेवढ्या खर्चापुरतं लोकांकडून शुल्क घेतलं गेलं पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये उपलब्ध आहेत त्या करिता शुल्कच न घेता या मोफत झाल्या पाहिजेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जन आरोग्य योजना आणि महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आणि या दोन योजनांच्या माध्यमातून आता जवळपास राज्यातील शंभर टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे, राज्यात साडेचार हजार हॉस्पिटल च्या माध्यमातून सर्व लोकांना मोफत उपचार उपलब्ध करून दिलेले आहेत असे ही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माजी आमदार स्वर्गीय गंगाधरराव फडणीस यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक कार्याला सुरुवात केली त्यांनी उपमहापौर म्हणून केलेले कार्य दिशादर्शक असेच आहे त्यांच्या नावाने सुरू झालेल्या डायग्नोसिस सेंटर मधून सर्वसामान्यांना परविन अशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत गरिबांना जीवनदान देणारे मंदिर म्हणून ओळख निर्माण व्हावी तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
गंगाधरराव फडणवीस डायग्नोक्सिस सेंटरचे लोकार्पण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत म्हणाले की सार्वजनिक कार्यकर्ता कसा असावा राजकीय कार्यकर्ता कसा असावा याचं उदाहरण त्यांनी आपल्या कृतीने घालून दिले आहे.. प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने एक भव्य लक्ष डोळ्यासमोर ठेवून ते काम करत होते त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या कामाला कधी स्वार्थाचा स्पर्श झाला नाही.आरोग्य सुविधेच्या या सेवा प्रकल्पला शुभेच्छा देताना डॉ भागवत यांनी या प्रकल्पपापासून स्पुर्ती घेउन गरीबाच्या आरोग्य सेवेला वाहिलेले अनेक प्रकल्प सुरु व्हावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
प्रारभी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते आरोग्य सेवा प्रकल्पाचा विधीवत शुभारंभ झाला या डायग्नोसी सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांची यावेळी त्यांनी पाहणी केली श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार संदीप जोशी यांनी प्रास्ताविकात येथे उपलब्ध असलेल्या विविध आरोग्य सुविधांची माहिती दिली सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात सर्व सुविधा येथे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी डायग्नोसिस सेंटरचे सचिव पराग सराफ एडवोकेट अक्षय नाहीत अनिरुद्ध भागवत रितेश गावंडे मीनल काळे वासंती देशपांडे संदीप बावस्कर तसेच महेंद्र भोगावकर आदी संचालकांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमाचे संचालन श्रीमती देशकर यांनी केले.