सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • इराण-अमेरिका तणाव पुन्हा टोकाला; ट्रम्प यांची बॉम्बहल्ल्याची चेतावणी, इराणच्या दोन अटींना नकार
  • तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतील ‘शक्तिवर्धक मध’, एक किलोची बाटली 9 लाखांना विकून भाविकांना गंडा; अशोक खरातचा आणखी एक कारनामा
 शहर

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न;मन निरोगी असेल तर कोणतीही स्पर्धा जिंकता येते : मनीषा कुऱ्हाडे

डिजिटल पुणे    24-03-2026 10:31:01

पुणे : मन निरोगी असेल तर कोणतीही स्पर्धा जिंकता येते. मानसिक स्वास्थ्य हे विचार, भावना, कृती यांच्या समन्वयावर अवलंबून असते. सकारात्मकता, सातत्य, धैर्य या मूल्यांच्या आधाराने मानसिक स्वास्थ्य उत्तम राखता येते. आज ताणतणाव हा युवकांपुढील आव्हान आहे. व्यक्त होण्याने मन मुक्त होते. मस्त रहा, स्वस्थ रहा, आनंदी रहा. असा संदेश मनमुक्त फाऊंडेशनच्या संचालक मनीषा कुऱ्हाडे यांनी दिला.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सेवकांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मनमुक्त फाऊंडेशनच्या संचालक मनीषा कुऱ्हाडे तर उदघाटक म्हणून विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य रंजना पाटील उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी प्रास्ताविकात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील महाविद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रम, विस्तार कार्य, क्रीडा, नावीन्यपूर्ण उपक्रमांचा तसेच उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला.

 

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे,  प्रा. गजाला सय्यद, प्रा. संजय कामठे, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. राहुल नरंगलकर, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. दत्तात्रय संकपाळ, डॉ. सुजाता टापरे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. लतेश निकम, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. ऋषिकेश कुंभार, प्रा. सायली कदम, दत्तात्रय बेसके, विद्यार्थी क्रीडा प्रतिनिधी शाहरुख सय्यद, विद्यार्थी,पालक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक मिळून आठशे चाळीस लोक या कार्यक्रमास उपस्थित होते.

या कार्यक्रमात एकूण १६८ पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. पारितोषिक वाचन डॉ. शुभांगी औटी, डॉ. सुजाता टापरे, प्रा. अविनाश मदने, प्रा. ऋषिकेश कुंभार,  प्रा. प्रतिभा डोंगरे, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. शरद गिरमकर, डॉ. प्रशांत मुळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आरती पवार, प्रा. अर्चना श्रीचिप्पा यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता अमिता मराठे यांनी गायलेल्या पसायदानाने झाली.


 Give Feedback



 जाहिराती