दिल्ली :दिल्लीतील गाझियाबादचा 31 वर्षीय हरीश राणा याने दीर्घ आजाराशी झुंज देत अखेर जगाचा निरोप घेतला. तब्बल 13 वर्षे कोमात असलेल्या हरीशला सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी दिली होती. त्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्याचे लाईफ सपोर्ट काढण्यात आले आणि 24 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला.
संपूर्ण देशभरात चर्चेत राहिलेला हरीश राणा आज अनंतात विलीन झाला आहे.हरीश राणावर आज दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.हरीश राणावर अंत्यसंस्कार होत असातना त्याचे वडील, आई, भाऊ उपस्थित असणारे सर्वंच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.हरीश राणाने जगाचा निरोप घेताना सहा जणांना आयुष्य देऊन गेला. हरीश राणाने अवयव दान केले आहेत. यामुळे आता सहाजणांना नवीन आयुष्य मिळणार आहे. हरीश राणा आणि त्याच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.अशोक राणा यांनी सोसायटीच्या WhatsApp ग्रुपवर हरीश राणाच्या निधनाची बातमी शेअर केली, त्या क्षणी लोकांचे डोळे पाणावले
हरीशच्या पार्थिवावर दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी कुटुंबीय आणि उपस्थित नागरिक अत्यंत भावूक झाले होते. वडील अशोक राणा यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करत मुलाच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली.हरीशने मृत्यूनंतरही समाजासाठी मोठे योगदान दिले. त्याच्या कुटुंबाने त्याचे फुफ्फुसे, दोन्ही मूत्रपिंडे आणि डोळ्यांचे कॉर्निया दान करण्याचा निर्णय घेतला. या अवयवदानामुळे सहा रुग्णांना नवे आयुष्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हरीश 2013 मध्ये चंदीगडमध्ये शिक्षण घेत असताना वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून पडला होता. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि तो तेव्हापासून कोमात होता. गेली 13 वर्षे तो पूर्णपणे लाईफ सपोर्ट आणि फीडिंग ट्यूबवर अवलंबून होता. त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती आणि शरीरावर गंभीर जखमा देखील झाल्या होत्या.मुलाची ही अवस्था पाहून कुटुंबाने न्यायालयात इच्छामरणासाठी अर्ज केला होता. सर्वोच्च न्यायालयाने 11 मार्च रोजी निष्क्रिय इच्छामरणाला परवानगी दिल्यानंतर त्याला दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर हळूहळू त्याचे उपचार थांबवण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांत उपचार आणि देखभालीमुळे कुटुंबावर मोठा आर्थिक ताण आला होता. मुलाची अवस्था पाहून पालकांनी न्यायालयात इच्छामरणाची परवानगी मागितली होती. सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, मात्र सर्वोच्च न्यायालयाने 11 मार्च रोजी परवानगी दिली.
गाझियाबादचे हरीश राणा ज्याला इच्छामरणाची परवानगी देण्यात आली होती, त्याच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. धाकटा भाऊ, आशिषने आज दिल्लीतील ग्रीन पार्क स्मशानभूमीत पार्थिवाला अग्नि दिला. वडील अशोक राणा (62) यांनी मुलगा हरीशला अखेरचा निरोप देत हात जोडून रडणाऱ्यांना विनंती करत म्हणाले, "रडू नका. माझ्या मुलाच्या आत्म्यास शांती लाभो, अशी मी प्रार्थना करतो. तो जिथे कुठे जन्मेल, तिथे देव त्याचे भले करो." 31 वर्षीय हरीशने काल, 24 मार्च रोजी, दिल्लीतील एम्स येथे अखेरचा श्वास घेतला. तो 13 वर्षांपासून कोमात होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंबाने हरीशची फुफ्फुसे, दोन्ही मूत्रपिंडे आणि कॉर्निया दान केले आहेत, ज्यामुळे सहा लोकांना नवीन जीवन मिळण्याची अपेक्षा आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंबाने हरीशची फुफ्फुसे, दोन्ही मूत्रपिंडे आणि कॉर्निया दान केले आहेत, ज्यामुळे सहा लोकांना नवीन जीवन मिळण्याची अपेक्षा आहे.
हरीश राणा 2013 मध्ये चंदीगडमध्ये विद्यार्थी असताना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडला होता. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली आणि तो गेली 13 वर्षे व्हेजिटेटिव्ह स्टेट मध्ये होता.हरीश गेल्या 13 वर्षांपासून कोमात होता. त्याच्या डोक्यातील नसाही सुकल्या होत्या. आपल्या मुलाला या अवस्थेत पाहू न शकल्यामुळे त्याच्या वृद्ध पालकांनी त्याचे 'लाइफ सपोर्ट' काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती केली होती. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली होती, परंतु त्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली ही भारतातील पहिलीच घटना ठरली आहे.
दीर्घ काळ चाललेल्या उपचारांमुळे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कोलमडले होते, तरीही त्यांनी शेवटपर्यंत हरीशची सेवा केली. अखेर त्याच्या इच्छामरणाच्या निर्णयामुळे त्याला वेदनांपासून मुक्ती मिळाली, आणि त्याचवेळी त्याच्या अवयवदानातून अनेकांना जीवनदानही मिळाले.
निष्क्रिय इच्छामरण म्हणजे रुग्णाला जिवंत ठेवण्यासाठी दिली जाणारी लाइफ सपोर्ट प्रणाली थांबवणे, ज्यामुळे नैसर्गिक मृत्यू होतो. भारतात या प्रक्रियेची अंमलबजावणी झालेल्या पहिल्या घटनांपैकी ही एक महत्त्वाची घटना मानली जात आहे.हरीश राणाच्या निधनाने देशभरातून हळहळ व्यक्त केली जात असून, त्याच्या अवयवदानामुळे अनेकांना नवजीवन मिळणार आहे, हीच त्याच्या आयुष्याची सर्वात मोठी देणगी ठरत आहे.या घटनेमुळे देशभरात इच्छामरण, मानवी संवेदना आणि अवयवदान याविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे. हरीश राणाच्या निर्णयाने अनेकांना जीवनदान मिळत असून, त्याच्या कुटुंबाच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.