मुंबई : रोहा येथील युनिकेम लॅबोरेटरीज लिमिटेडमध्ये कार्यरत स्टाफ कामगारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी कंपनीने नियमांचे पालन करून वेतन अदा करावे, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. रोहा येथील कामगारांच्या विविध समस्यांबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस माजी आमदार अनिकेत तटकरे, कंपनीचे अधिकारी तसेच कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या कामगारांवर कोणताही अन्याय होऊ नये. कंपनीने कोणतेही निर्णय घेताना कामगारांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घ्यावा तसेच कामगारांशी समन्वय साधूनच धोरणे राबवावीत. कामगारांना नियमानुसार वेतन अदा करणे आवश्यक असून त्यात कोणतीही कपात किंवा विलंब होऊ नये. याशिवाय, कामगारांना मिळणाऱ्या आजारपणातील रजांमध्ये कपात करू नये. स्थानिक कामगारांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांची इतरत्र बदली करू नये, असे निर्देशही मंत्री तटकरे यांनी दिले