सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धक्कादायक! डोळ्यादेखत चार एक गव्हाची झाली राखरांगोळी, शेतकऱ्याने फोडला टाहो, परभणीतील शेतकऱ्याला मोठा फटका
  • 'सरकारने खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री तुरुंगात जातील’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
  • इच्छामरणाच्या परवानगीनंतर 31 वर्षीय हरीश राणा अनंतात विलीन; वडील हात जोडून म्हणाले, 'अजिबात रडायचं नाही, माझ्या मुलाला..' जातानाही अवयवदान करत 6 जणांना 'आयुष्य' देत गेला
  • रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
 जिल्हा

उरण नगर पालिका क्षेत्रात पाण्याचा अपव्यय !अनेक ठिकाणी छोटे पाईप लाईन फुटून पाणी वाया ;नागरिकांमध्ये संताप

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    26-03-2026 12:48:52

उरण : उरण नगर पालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय  होत असल्याचे अनेक ठिकाणी पाहवयास मिळत आहे.शहरातील काही भागात पाण्याचे कारंजे उडत असून पाणी  वाया जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. उरण नगर पालिका क्षेत्रात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज वाढली आहे, परंतु पाण्याचे स्रोत कमी आहेत. रानसई धरण आणि पुनाडे धरण हे दोन प्रमुख पाण्याचे स्रोत आहेत, परंतु त्यांची क्षमता दिवसे दिवस कमी कमी होत चालली आहे. 
 
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व पाण्याची बचत करण्यासाठी उरण नगर पालिकेने कडक व धडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, पाण्याची अपव्यय होत असल्याचे अनेक वेळा उरण नगर पालिकेला कळवले आहे, परंतु अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. उरण नगर पालिकेचे अधिकारी म्हणतात की, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी कारवाई केली जाईल. पाण्याचे कारंजे उडून पाणी फुकट वाया जात असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.


 Give Feedback



 जाहिराती