सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धक्कादायक! डोळ्यादेखत चार एक गव्हाची झाली राखरांगोळी, शेतकऱ्याने फोडला टाहो, परभणीतील शेतकऱ्याला मोठा फटका
  • 'सरकारने खरात प्रकरणात प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री तुरुंगात जातील’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
  • इच्छामरणाच्या परवानगीनंतर 31 वर्षीय हरीश राणा अनंतात विलीन; वडील हात जोडून म्हणाले, 'अजिबात रडायचं नाही, माझ्या मुलाला..' जातानाही अवयवदान करत 6 जणांना 'आयुष्य' देत गेला
  • रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
 DIGITAL PUNE NEWS

उरण पनवेल मार्गावर मोठी दुर्घटना टळली; पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळल्याने वाहतूक ठप्प, आता रस्ता मोकळा !

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    26-03-2026 12:52:18

उरण : उरण-पनवेल महामार्गावरील चिर्ले जवळील नागाव फाटा येथे काल (बुधवारी) सकाळी १०:३० च्या सुमारास उड्डाणपुलाच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी सपोर्ट स्ट्रक्चरला एका भरधाव ट्रेलरने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे पुलाचा जड लोखंडी सांगाडा थेट रस्त्यावर कोसळला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी उरण परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
 
चिर्ले (नागाव) येथे सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी सांगाड्याला एका ट्रेलरने जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की लोखंडी स्ट्रक्चर थेट रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. मिळालेल्या माहितीनुसार ट्रेलर चालकाने एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गाडी उभी केली होती. परंतु हॅन्ड ब्रेक निसटल्याने अवजड ट्रेलर उतारावरून पुढे सरकला आणि थेट पुलाच्या लोखंडी बांधकामात शिरला चालकाचा ताबा नसलेला हा ट्रेलर वेगाने धडकल्याने हा अपघात घडला. या धडकेत ट्रेलर चा एक्सेल बार तुटून मोठे नुकसान झाले आहे .आणि पुलाचे लोखंडी स्ट्रक्चर कोसळल्याने वाहतुकीची कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले आहे.निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
 
 महामार्ग प्राधिकरणाने क्रेनच्या साहाय्याने पडलेले लोखंडी खांब बाजूला केले असून, आता हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. उरण आणि पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक आता सुरळीत सुरू आहे. या घटनेबाबत माहिती देताना उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच डी मुलाणी म्हणाले की, अपघात घडल्यानंतर तातडीने आमचे पथक घटनास्थळी पोहोचले. ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान निष्काळजीपणे वाहन चालवल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती