पुणे : इतिहास अभ्यासक व व्याख्याते जगनाथ लडकत यांना ‘शिवतेज पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. शिवजयंती दिनानिमित्त लव महादेव येथे आयोजित समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समस्त हिंदू आघाडीच्या वतीने हा गौरव करण्यात आला.
ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते लडकत यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी इतिहास अभ्यासक डॉ. अनिल अश्टेकर व हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे उपस्थित होते.
लडकत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांसमोर इतिहासाचे धडे प्रभावीपणे मांडले असून, तब्बल २२ हजार विद्यार्थ्यांसमोर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. विशेषतः श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाचा इतिहास जिवंत ठेवण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
‘पराक्रम हा जातीय सीमांच्या पलीकडे असतो, मात्र आजही त्याकडे जातीय दृष्टिकोनातून पाहिले जाते, ही खंत आहे,’ असे मत लडकत यांनी व्यक्त केले.