मुंबई :देशात इंधनटंचाई निर्माण होऊन पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना दिलासा देत अशा बातम्यांना स्पष्टपणे खोटे ठरवले आहे. राज्यात लवकरच लॉकडाऊन लागू होणार आणि इंधनाचा तुटवडा निर्माण होणार, अशा प्रकारचे संदेश सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट स्पष्टीकरण दिले आहे.त्यावर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या देशात इंधनाचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे कोणतेही संकट नाही. देशात कोणतेही लॉकडाऊन लागणार नाही, तशा आशयाच्या अफवा जर कुणी परसवत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मुख्यमंत्री म्हणाले की, देशात सध्या इंधनाचा कोणताही तुटवडा नाही आणि पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे लॉकडाऊन लावण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. केंद्र सरकारनेही लॉकडाऊनबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अशा अफवांबाबत सरकार कठोर भूमिका घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. खोटे मेसेज तयार करणे किंवा फॉरवर्ड करणे हा गुन्हा मानला जाईल आणि संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. त्यामुळे या विषयी कोणतीही अफवा पसरवण्याऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. अशा प्रकारचे फेक व्हॉट्सॲप मेसेज जरी फॉरवर्ड केली तरी तो गुन्हा ठरेल. त्यामुळे कुणीही खोट्या अफवा पसवरू नये, अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार."
दरम्यान, वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा परिणाम सामान्य नागरिकांवर होऊ नये यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. यामुळे इंधन दरांवरील अतिरिक्त भार कमी होणार असून तेल कंपन्यांना काही प्रमाणात तोटा सहन करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, देशात सध्या किमान एक महिन्यापुरता पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
याच संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनीही नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. देशात लॉकडाऊन लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संकटाच्या काळात संयम बाळगणे आवश्यक असून अफवा पसरवणे देशहिताला घातक ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.