सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स; देवेंद्र फडणवीसांना विचारताच एका वाक्यात विषय संपवून टाकला!
  • भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
 शहर

डॉ.गिरीश आफळे लिखित श्रीगुरू तेग बहादुरजी - हिंद की चादर पुस्तकाचे प्रकाशन

डिजिटल पुणे    30-03-2026 10:31:17

पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण येथील सेक्टर २७ या वस्तीतील विराट हिंदू संमेलनात डॉ. गिरीश आफळे यांनी लिहिलेल्या आणि भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन या संस्थेने प्रकाशित केलेल्या, श्रीगुरू तेग बहादुरजी - हिंद की चादर या पुस्तकाचे विमोचन सुप्रसिद्ध व्याख्याते, मन करारे प्रसन्न कार डॉ. संजय उपाध्ये यांच्या हस्ते झाले. या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संजय उपाध्ये तसेच देहूरोड गुरुद्वाराचे अध्यक्ष गुरुमित सिंह रत्तू,  तसेच संमेलनाचे अध्यक्ष सूर्यकांत मुथियन, ह. भ. प. विनया कोल्हटकर, डॉ. माधवी महाजन, स्व. दत्तोपंत म्हसकर संस्थेचे सचिव मिलिंद कुलकर्णी, आर.सी. सी. कन्सल्टंट मोहन साखळकर हे उपस्थित होते. 


आपल्या भाषणात डॉक्टर संजय उपाध्ये म्हणाले, "असे पुस्तक नव्या पिढीने वाचणे अत्यंत आवश्यक आहे. अशा बलिदानामुळे हिंदूधर्म इतकी वर्षे टिकून राहिला आहे."पुस्तकाचे लेखक डॉ. गिरीश आफळे म्हणाले, "दिल्लीत त्यावेळी क्रूर आणि धर्मांध औरंगजेब बादशाह होता. त्याने काशी विश्वनाथाचे, मथुरेच्या केशव देवाचे मंदिर व इतर अनेक मंदिरे पाडली होती. हिंदूंना सक्तीने बाटवण्याचा सपाटा लावला होता. अशावेळी काश्मिरी पंडित शिखांचे नववे गुरू श्रीतेगबहादुरजी यांच्याकडे अभयदान मागण्यासाठी आले. ते आव्हान श्रीगुरुजींनी स्वीकारले आणि औरंगजेबालाच उलट आव्हान दिले की, "औरंगजेबाने प्रथम त्यांचे (गुरूंचे) धर्मांतर करून दाखवावे मगच काश्मिरी पंडित धर्मांतर करतील." झाले. श्री गुरु तेग बहादुर जी आणि त्यांच्या तीन प्रिय शिष्यांना अटक करून त्यांचा चाळीस दिवस छळ करून मग दिल्लीत आणण्यात आले. बाटून मुसलमान व्हा अथवा मृत्यूला सामोरे जा, असे दोनच पर्याय त्यांच्यासमोर होते. बाटण्याचा पर्याय श्री गुरुजींनी नाकारला. श्रीगुरूंवर दबाव आणण्यासाठी त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या तीन प्रिय शिष्यांना वेगवेगळ्या पण क्रूर पद्धतीने ठार मारण्यात आले. श्रीगुरुजींनीही धर्मांतरित होण्यास नकार देताच त्यांचा ११ नोव्हेंबर १६७५ या दिवशी दिल्लीच्या चांदणी चौकात शिरच्छेद करण्यात आला.  

 

 या पुस्तकात खालील तीन गोष्टींवर मुख्य भर दिलेला आहे. १) त्यावेळी हिंदूधर्म व शीख पंथ हे वेगवेगळे नसून परस्परांमध्ये दुधात साखर मिसळावी तसे मिसळून गेले होते. कालांतराने इंग्रजांनी हिंदू व शिख हे वेगळे आहेत हा प्रचार केला आणि पुढे मार्क्सवादी इतिहासकारांनी तो प्रचार तसाच उचलून धरला. 
२) बंजारा समाज आणि वाल्मिकी (सफाई कर्मचारी) समाज यांचा श्रीगुरूंच्या जीवनात किती व कसा महत्त्वाचा भाग  होता हे लेखकाने विस्तृतपणे सांगितले आहे. 
३) औरंगजेबप्रेमी लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी हे पुस्तक फारच उपयुक्त ठरेल.
हे पुस्तक तरुणांनीच नव्हे तर सर्वांनी अवश्य वाचले पाहिजे. आज आपण जे काही हिंदू म्हणून शिल्लक आहोत त्याच्यासाठी आत्मबलिदान करणाऱ्यांमध्ये श्रीगुरु तेगबहादुरजी हे अग्रेसर होते. औरंगजेबाने १६८९ यावर्षी अत्यंत  क्रूरपणे छळ करून छत्रपती संभाजी महाराजांनाही ठार मारले होते."


 Give Feedback



 जाहिराती