सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: ठाकरेंचे खासदार शिंदेसेनेच्या डिनरला हजर; दोन खासदारांच्या उपस्थितीने ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय!
  • अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्नी कल्पना दोन दिवसांपासून बेपत्ता, SIT समोर मोठे आव्हान
 क्राईम

भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे; 4 सिमकार्डचा वेगवेगळ्या कामांसाठी वापर, SIT तपास अंतिम टप्प्यात

डिजिटल पुणे    31-03-2026 16:56:59

नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर येत असून, विशेष तपास पथकाकडून (SIT) त्याची कसून चौकशी सुरू आहे. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या चौकशीत अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्राथमिक तपासात अशोक खरात हा चार वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरत असल्याचे उघड झाले आहे. यातील एक क्रमांक व्हीआयपी व्यक्तींशी संपर्कासाठी, दुसरा काही निवडक भक्त आणि महिलांशी संवादासाठी, तिसरा आर्थिक व्यवहारांसाठी, तर चौथा सर्वसामान्य लोकांशी संपर्कासाठी वापरला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, फॉरेन्सिक पथकाकडून संबंधित मोबाईल फोनमधील डेटा रिकव्हरीचे काम सुरू असून, कॉल रेकॉर्ड आणि मेसेजेसच्या आधारे आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणा या डेटाचा सखोल अभ्यास करत आहे.

या प्रकरणातील चौकशी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, पोलिस कोठडी संपण्यापूर्वी अधिकाधिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला जात आहे. तपासादरम्यान महिलांशी संबंधित गंभीर आरोपांचीही चौकशी सुरू आहे. यासंदर्भात काही वैद्यकीय बाबींचाही तपास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच, नाशिकमधील काही डॉक्टरांची चौकशी होऊ शकते, अशीही चर्चा असून, पोलिसांकडून या सर्व बाबींची पडताळणी सुरू आहे. पुढील सुनावणीदरम्यान या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.सध्या पोलिसांकडून सर्व पुरावे आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण सुरू असून, आगामी काळात या प्रकरणात आणखी मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती