सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आखाती तणावाचा परिणाम! व्यावसायिक LPG सिलेंडर महाग; देशभरात दरवाढीचा फटका
  • मोठी बातमी: अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, गर्दीतून पोहोचलेला खरात 5 मिनिटात कोर्टरुममधून बाहेर!
 क्राईम

भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे वळण; पत्नी फरार, मुलगा ताब्यात – कोर्टात हजेरीपूर्वी रात्री नाट्यमय हालचाली

डिजिटल पुणे    01-04-2026 10:51:13

नाशिक : नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. आज त्याची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, तपास यंत्रणांकडून कोठडी वाढवण्याची मागणी होण्याची शक्यता आहे.

काल उशिरापर्यंत या प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडल्या. शिर्डी येथील जमीन फसवणूक प्रकरणात खरातसोबत त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, एसआयटीचे पथक घराकडे पोहोचण्याआधीच त्याची पत्नी कल्पना खरात फरार झाली. याच वेळी पोलिसांनी त्याचा मुलगा हर्षवर्धन याला ताब्यात घेतले.

तपासात सहकार्य न केल्यामुळे आता खरातसमोरच त्याच्या मुलाची चौकशी करण्याची तयारी सुरू आहे. अधिक माहिती मिळवून फरार आरोपीला अटक करण्यावर तपास यंत्रणांचा भर आहे. सुरुवातीला लैंगिक शोषणाच्या आरोपांवर लक्ष केंद्रित करत पुढील गुन्ह्यांचा तपास टप्प्याटप्प्याने केला जाणार आहे.

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आर्थिक व इतर व्यवहारांची साखळी उलगडण्यासाठी एसआयटीने खरातचा चार्टर्ड अकाउंटंट, ईशान्यश्वर मंदिरातील पुजारी तसेच एका सराफ व्यावसायिकाचीही सखोल चौकशी केली आहे. पुरावे मजबूत करण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय असून आज न्यायालयात महत्त्वाची कागदपत्रे सादर केली जाण्याची शक्यता आहे.आता न्यायालयात सरकारी पक्ष कोणती भूमिका मांडतो आणि खरातच्या कोठडीबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती