सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
  • राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; मुंबईत आज हलक्या सरी, पुणे, सातारा, नाशिकमध्ये गारपिटीची शक्यता
  • आखाती तणावाचा परिणाम! व्यावसायिक LPG सिलेंडर महाग; देशभरात दरवाढीचा फटका
  • मोठी बातमी: अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, गर्दीतून पोहोचलेला खरात 5 मिनिटात कोर्टरुममधून बाहेर!
 जिल्हा

शिवरायांचे विचार जगणारा नेता महेंद्रशेठ घरत! रोहे तालुक्यातील ग्रामस्थांचे मत

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    01-04-2026 15:04:03

उरण : महेंद्रशेठ घरत सध्या काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष या नात्याने रायगडच्या दौऱ्यावर आहेत. संघटन सृजन अभियानांतर्गत हा दौरा सुरू आहे. मंगळवारी (ता. ३१ )त्यांनी पेण, रोहे, माणगाव या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सोबत कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या रागिणी नायक आहेत. त्या रायगड जिल्हा निरीक्षक आहेत. त्यामुळे त्यांनी प्रत्येक तालुकानिहाय कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची मते आजमावून घेतली. दरम्यान, महेंद्रशेठ घरत यांनी पाली येथील बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक मंदिरांना महेंद्रशेठ घरत यांनी सढळ हस्ते देणग्या दिलेल्या आहेत. त्यामुळे रोहे तालुक्यात त्यांचे पदार्पण होताच तेथील देवकान्हे आणि दिव येथील मंदिरात ते गेले. त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी महेंद्रशेठ घरत यांचे जोरदार स्वागत केले. दिव येथील कोळी समाजाने हनुमान मंदिर बांधले आहे. या मंदिरासाठी महेंद्रशेठ घरत यांनी भरघोस देणगी दिली आहे. त्यामुळे महेंद्रशेठ घरत मंदिरात येणार याची चाहूल लागताच संपूर्ण कोळी समाज त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता.

'छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जगणारा कलियुगातील एकमेव नेता महेंद्रशेठ घरत!'  असे यावेळी रोहे तालुक्यातील ग्रामस्थांनी बोलून दाखवले. दिव येथील सुंदर हनुमान मंदिर पाहून महेंद्रशेठ घरत यांना मनस्वी आनंद झाला. आपण योग्य ठिकाणी देणगी दिली आणि ग्रामस्थांनी तिचा योग्य वापर केला आणि देखणे मंदिर बांधले याचे समाधान महेंद्रशेठ घरत यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. यावेळी दिव ग्रामस्थांनी महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "कोळी समाजावर माझे नितांत प्रेम आहे. अथांग समुद्रात लाटांशी झुंज देणारा कोळी समाज कौतुकास पात्र आहे. हा समाज अहोरात्र कष्ट करून सन्मानाने जगतो. देवावर अपार श्रद्धा ठेवून भक्तिभावाने उत्सव साजरा करून गावात एकोपा ठेवतो. त्यामुळे दिव येथील कोळी समाजाने सुंदर हनुमान मंदिर बांधून गावची शान वाढवली आहे. त्यामुळे दिव ग्रामस्थांचे अभिनंदन!"यावेळी दिव येथील ग्रामपंचायत सदस्य आणि हनुमान मंदिर अध्यक्ष सत्यवान तांडेल, उपाध्यक्ष महादेव तांडेल, सागर हवालदार, शांताराम हवालदार, महेंद्र कठोरे, चंद्रकांत हवालदार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती