सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा कहर! साताऱ्यात गारांच्या तडाख्यानं सोलर पॅनल्स फुटले, करच्या काचांना तडे; बळीराजा दुहेरी संकटात, विदर्भ-मराठवाड्यालाही पावसानं झोडपलं
  • पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; एप्रिल महिन्यात एका दिवसात झाला सर्वाधिक पाऊस
 जिल्हा

​बार्शीत अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या ५ व्या वर्धापन दिना निमित्त 'नारीशक्ती सन्मान सोहळा ' उत्साहात संपन्न;लोकनेते मा. आ. राजेंद्र राऊत यांच्या मुलाखतीची राज्यभर चर्चा!

डिजिटल पुणे    04-04-2026 10:48:09

​बार्शी : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जनसामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या 'अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटने'चा ५ वा वर्धापन दिन आणि 'नारी शक्ती सन्मान सोहळा' बार्शी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. ​

देशपांडे व्हेज हॉल येथे आयोजित या सोहळ्याचे अध्यक्षपद संघटनेचे संस्थापक तथा केंद्रीय अध्यक्ष मा. श्री. राजा माने यांनी भूषविले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते मा. आ. राजेंद्र राऊत, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, तहसीलदार एफ. आर. शेख, नगराध्यक्षा सौ. तेजस्विनीताई कथले, पंचायत समिती सभापती सो. मीनाक्षीताई रोंगे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजय गरड, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रीय संघटक तेजस राऊत, प्रतिबिंब प्रतिष्ठानचे सचिव दिपक नलावडे, राष्ट्रीय समन्वय मुरलीधर चव्हाण, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, राज्य कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत वायकर, संतोष सूर्यवंशी, राज्य सल्लागार मयूर गलांडे, राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके, जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, जिल्हा सहसचिव दिनेश मेटकरी, माजी नगरसेवक प्रशांत कथले, दीपक रोंगे, प्रशांत कटारे, पंढरपूर शहर उपाध्यक्ष अजित देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या जिल्ह्यातील 6 महिलांचा मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये ​सौ. अनु प्रसाद मोहिते - जीवन गौरव सन्मान, ​ह.भ.प. शिवलीलाताई पाटील - कीर्तन रत्न सन्मान, ​सौ. मनिषा भगवान लोकरे - क्रीडा रत्न सन्मान, ​सौ. सायरा नुह मुल्ला - समाज रत्न सन्मान, ​सौ. सारीका गिरीश संघवी - मातृत्व गौरव सन्मान, ​श्रीमती मनिषा मुकुंद गुरव - आदर्श महिला वाहक सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 

​​या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे बार्शी तालुक्याचे माजी आमदार लोकनेते राजेंद्र राऊत यांची प्रकट मुलाखत राज्यभर चर्चेचा विषय ठरली. ज्येष्ठ संपादक राजा माने, एबीपी माझाचे पत्रकार मयुर गलांडे, आणि महिला जिल्हाध्यक्षा निता देव यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार राऊत यांनी बार्शीच्या विकासावर आणि राजकीय प्रवासावर सविस्तर भाष्य केले. राजेंद्र राऊत यांच्या जीवनामधील वर्गातील मॉनेंटर पासून विधानसभा सदस्य व लोकनेते बनन्यापर्यंतच्या प्रवासातील अनेक गोष्टींना उजाळा दिला. 

​संघटनेचे संस्थापक तथा केंद्रीय अध्यक्ष राजा माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, "गेल्या ५ वर्षात ७ राज्यांमध्ये संघटनेने आपल्या कामाचा विस्तार केला असून, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जनसामान्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत." संघटनेमध्ये राज्यातील 13 हजार पत्रकार सदस्य असून, आतापर्यंत संघटनेच्या अंतर्गत प्रतिबिंब प्रतिष्ठान च्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी व पाल्यांच्या शैक्षणासाठी तब्बल 17 लक्ष रुपये निधी वितरित करण्यात आल्याचेही यावेळी राजा माने यांनी म्हटले. याप्रसंगी तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे भाऊसाहेब आंधळकर, कृष्णराज बारबोले आदींनी आपले मनोगत व्यक्त करत संघटनेच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये राज्य प्रसिद्धी धिरज शेळके यांनी संघटनेच्या कार्याचा व विस्ताराचा आढावा सांगितला. तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बसवंत यांनी 4 मे 2026 रोजी कला अकादमी पणजी, गोवा येथे संघटनेचे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता देव यांनी केले तर उपस्थितांचे आभार भैरवनाथ चौधरी यांनी मानले. याप्रसंगी विश्वगुरु माऊली मुलींची वारकरी शिक्षण संस्थेतील 50 मुलींनी संप्रदायिक पद्धतीने टाळाच्या गजरामध्ये पाऊल खेळत पाहुण्यांचे स्वागत केले. सुप्रसिद्ध सनई वादक राऊत बंधूनी सनई चौघाडाच्या वादनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. तर माऊली भिसे यांच्या संबळ वादनाने कार्यक्रमाची आणखीनच शोभा वाढली. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अजय पाटील, महिला जिल्हाध्यक्ष निता देव, बार्शी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बसवंत, शंकर लाखे, अक्षय बारंगुळे, रवींद्र सांगोळे, विशाल मोरे, विश्वास वीर, श्रीशैल माळी, भैरवनाथ चौधरी, दत्ता सुरवसे, किशोर शेटे, कदीर बागवान, सुनील अवघडे, दत्ता गुरव, गोविंद भिसे, उमेश नायकुडे, राहुल भालशंकर, किरण माने, वैशाली ढगे यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला बार्शी तालुक्यातील पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर व बार्शीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्धापन दिनाच्या यशस्वीतेचे शिल्पकार 

मुरलीधर चव्हाण, अमित इंगोले, सूर्यकांत वायकर, संतोष सूर्यवंशी, मयूर गलांडे, धिरज शेळके, अजय पाटील, दिनेश मेटकरी, निता देव, सिद्धार्थ बसवंत, शंकर लाखे, अक्षय बारंगुळे, रवींद्र सांगोळे, विशाल मोरे, विश्वास वीर, श्रीशैल माळी, भैरवनाथ चौधरी, दत्ता सुरवसे, किशोर शेटे, कदीर बागवान, सुनील अवघडे, दत्ता गुरव, गोविंद भिसे, उमेश नायकुडे, राहुल भालशंकर, किरण माने, वैशाली ढगे आदींनी अनमोल योगदान दिले.


 Give Feedback



 जाहिराती