सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा कहर! साताऱ्यात गारांच्या तडाख्यानं सोलर पॅनल्स फुटले, करच्या काचांना तडे; बळीराजा दुहेरी संकटात, विदर्भ-मराठवाड्यालाही पावसानं झोडपलं
  • पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; एप्रिल महिन्यात एका दिवसात झाला सर्वाधिक पाऊस
 जिल्हा

डुलकी ठरली जीवघेणी! पुलावरून कार कालव्यात पडून आई-वडील व विवाहित मुलीचा मृत्यू; जावई गंभीर

डिजिटल पुणे    04-04-2026 16:36:12

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते परिसरात शुक्रवारी पहाटे एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. मुंबईहून माळशिरसकडे जाणारी कार नीरा उजव्या कालव्यावरील पुलावरून थेट पाण्यात कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पहाटे सुमारे चार ते पाचच्या सुमारास हा अपघात झाला. कार चालकाला झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार पुलावरून खाली कालव्यात पडली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

या दुर्घटनेत आई-वडील आणि त्यांची विवाहित मुलगी यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर जावई गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.


 Give Feedback



 जाहिराती