सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा कहर! साताऱ्यात गारांच्या तडाख्यानं सोलर पॅनल्स फुटले, करच्या काचांना तडे; बळीराजा दुहेरी संकटात, विदर्भ-मराठवाड्यालाही पावसानं झोडपलं
  • पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; एप्रिल महिन्यात एका दिवसात झाला सर्वाधिक पाऊस
 क्राईम

पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार: 7 वर्षीय मुलीवर अत्याचार; आईच्या सतर्कतेमुळे आरोपी जेरबंद

डिजिटल पुणे    04-04-2026 17:49:42

पिंपरी-चिंचवड : नाशिकमधील भोंदू अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या संतापजनक घटनेनं महाराष्ट्र हादरला असतानाचा बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनाही काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विनायकनगरमधील शिवशंभो कॉलनी येथे एका 40 वर्षीय व्यक्तीने सात वर्षांच्या निरागस मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपीने मुलीला आपल्या खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार केला. तसेच ही बाब कोणालाही सांगितल्यास जीव घेण्याची धमकीही दिली. दुसऱ्या दिवशी, 3 एप्रिल रोजी सकाळी पुन्हा तोच प्रकार घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यावेळी मुलीची आई आणि नातेवाईकांनी खिडकीतून हा प्रकार पाहिल्याने संपूर्ण घटना उघडकीस आली.यानंतर मुलीच्या आईने तातडीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे येथे धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी रामू कुंजल निसाद (वय 40) याला अटक केली आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, राज्यात बाल अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती