सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात अवकाळीचा कहर! साताऱ्यात गारांच्या तडाख्यानं सोलर पॅनल्स फुटले, करच्या काचांना तडे; बळीराजा दुहेरी संकटात, विदर्भ-मराठवाड्यालाही पावसानं झोडपलं
  • पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; एप्रिल महिन्यात एका दिवसात झाला सर्वाधिक पाऊस
 क्राईम

अमरावतीत 18 वर्षीय तरुणीवर अत्याचार; मित्रालाही बेदम मारहाण, पाच आरोपी अटकेत

डिजिटल पुणे    04-04-2026 18:10:27

अमरावती : अमरावती येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. 18 वर्षीय तरुणीवर जंगल परिसरात अत्याचार करण्यात आला असून तिच्यासोबत असलेल्या मित्रालाही निर्दयी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे.

ही घटना 28 मार्च रोजी भानखेडा रोडलगतच्या जंगल भागात घडली. पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना पाच जणांच्या टोळीने त्यांना अडवले. दोघांना धमकावत मारहाण करण्यात आली आणि मित्राकडील रोख रक्कमही जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर आरोपींपैकी एकाने तरुणीवर अत्याचार केला.घटनेनंतर दोघांचीही प्रकृती खालावली होती. पीडितेला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

दरम्यान, फ्रेजरपुरा पोलीस यांनी तपासाची गती वाढवत संशयितांचा शोध घेतला. ओळख परेडमध्ये पीडितेने पाचही आरोपींना ओळखले. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमीही समोर येत आहे.या घटनेनंतर नागरिकांकडून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.


 Give Feedback



 जाहिराती