सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • संतोष देशमुख केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला, माझ्या खच्चीकरणासाठी प्रयत्न केले गेले; धनंजय देशमुखांचा दावा
  • मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
  • पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
 शहर

लोकजनशक्ती पार्टी (रामविलास ) च्या अनुसूचित जाती ,अनुसूचित जनजाती प्रकोष्ठ ची राष्ट्रीय बैठक

डिजिटल पुणे    06-04-2026 11:04:19

  पुणे  : लोकजनशक्ती पार्टी (रामविलास ) च्या अनुसूचित जाती ,अनुसूचित जनजाती प्रकोष्ठ ची राष्ट्रीय बैठक एम.पी. क्लब,दिल्ली येथे ३ एप्रिल २०२६ रोजी झाली .प्रत्येक जिल्ह्यात जाऊन एससी एसटी सेलची सदस्य नोंदणी करण्याचा निर्धार करण्यात आला.महाराष्ट्रासह दक्षिण राज्यातील संघटन बळकट करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. प्रकोष्ठ चे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानचंद गौतम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला पक्षाचे अनुसूचित जाती ,अनुसूचित जनजाती महाराष्ट्र राज्य प्रकोष्ठ अध्यक्ष संजय अल्हाट यांच्यासह विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष ,पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते . संजय आल्हाट यांनी यावेळी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेवून पक्ष उपक्रमांची माहिती दिली . तळा गाळातील ,गरीब ,वंचित ,मागास वर्गात शासकीय योजनांचे लाभ पोचतात की नाही यावर पक्ष लक्ष ठेवेल आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करेल ,अशी ग्वाही त्यांनी दिली .देशातील सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते


 Give Feedback



 जाहिराती