सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बारामती पोटनिवडणुकीत रंगत वाढली; “एक मत हीच खरी श्रद्धांजली” – रोहित पवारांचे भावनिक आवाहन
  • ट्रम्प यांनी जाहीर शिवीगाळ करत धमकी देताच इराणकडून जागतिक इंधन पुरवठा ठप्प करण्याची धमकी; पुढील 48 तासात काय होणार? युद्धखोर ट्रम्पमुळे पेट्रोल, डिझेल, अन् गॅससाठी जगाला धडकी भरायची वेळ
 विश्लेषण

अमेरिका–इराण तणाव टोकाला; 45 दिवसांच्या युद्धबंदीवर चर्चा, पुढील 48 तास निर्णायक

डिजिटल पुणे    06-04-2026 14:47:26

अमेरिका : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 45 दिवसांच्या संभाव्य युद्धबंदीबाबत पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिका, इराण आणि प्रादेशिक मध्यस्थ देशांमध्ये सुरू असलेल्या या चर्चांमुळे पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इराणसमोर काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये प्रादेशिक स्थैर्य राखणे, ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधील वाहतूक सुरळीत ठेवणे आणि अत्यंत समृद्ध युरेनियमच्या प्रश्नावर तोडगा काढणे यांचा समावेश आहे. मात्र, इराणने अद्याप या प्रस्तावांना अंतिम मान्यता दिलेली नाही.

दरम्यान, पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की हे देश मध्यस्थीची भूमिका बजावत असून दोन्ही बाजूंमध्ये संदेशांची देवाणघेवाण सुरू आहे. या प्रक्रियेत अमेरिकेचे विशेष दूत आणि इराणचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात अप्रत्यक्ष संवाद सुरू असल्याचेही सांगितले जाते.

या चर्चेत दोन टप्प्यांचा प्रस्ताव पुढे आला आहे. पहिल्या टप्प्यात 45 दिवसांची युद्धबंदी लागू केली जाईल. या काळात कायमस्वरूपी शांततेसाठी पुढील वाटाघाटी होतील. गरज भासल्यास ही मुदत वाढवण्याचाही पर्याय ठेवण्यात आला आहे.

तणाव मात्र अद्याप कमी झालेला नाही. करार न झाल्यास इराणमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर कारवाई करण्याचा इशारा अमेरिकेकडून देण्यात आला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखाती प्रदेशातील ऊर्जा आणि पाणी प्रकल्पांवर हल्ल्याची चेतावणी दिली आहे. विशेषतः ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधील परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.सध्याच्या परिस्थितीत पुढील 48 तास निर्णायक मानले जात आहेत. युद्धाची तीव्रता वाढण्यापूर्वी तात्पुरता का होईना, पण करार होतो का याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती