ठाणे : ठाण्यातील एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेने परिसर हादरला आहे. सात वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणाने पुन्हा एकदा महिलांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ठाण्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून सात वर्षांच्या निरागस मुलीवर अत्याचार झाल्याने परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ठाण्यातील एका बांधकाम सुरू असलेल्या साईटवर घडली. पीडित मुलीचे वडील याच ठिकाणी कामगार म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी मुलीची आई गावी गेल्याने घरात वडील आणि तिची चार वर्षांची बहीण असे तिघेच होते. याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने मुलगी एकटी असताना तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे, आरोपी काही दिवसांपूर्वीच त्या साईटवर कामासाठी आला होता, तर त्याचा भाऊ आधीपासून तेथे कार्यरत होता. घटना घडल्यानंतर आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वेगवेगळी पथके तयार केली आणि अल्पावधीतच आरोपीला अटक केली. आरोपी बिहारमधील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.या घटनेमुळे ठाण्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.