सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
  • अजितदादांचा अपघात की घातपात? भोंदू अशोक खरातच्या अघोरी पूजेचं कनेक्शन; जानेवारीतील CDR ठरणार कळीचा पुरावा, अमोल मिटकरींची पोस्ट चर्चेत
  • मुंबईत 4 प्रकल्प, गतीमान प्रवासाचा संकल्प; दोन मेट्रोंचे लोकार्पण, ठाणे-बोरीवली बोगद्याचे भूमीपूजन, पॉड टॅक्सीही लवकरच
  • मोठी बातमी: दोन महिला पोलीस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात होत्या, DCP आणि ACP दर्जाच्या अधिकारी आवडत्या पोस्टिंगसाठी बाबाकडे गेल्याची चर्चा
 जिल्हा

मैदानांअभावी तरुणांची अवस्था 'विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर' : महेंद्रशेठ घरत

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    07-04-2026 18:16:39

उरण : ग्रामीण  भागातील तरुणांमध्ये  टॅलेंट आहे; परंतु  आजघडीला अनेक गावांत खेळाडू,तरुणांना खेळण्यासाठी हक्काची मैदानेच नाहीत. त्यामुळे 'विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर' या म्हणीप्रमाणे ग्रामीण भागातील तरुणांची हक्काच्या मैदानांअभावी अवस्था झालेली आहे. हे सारे विदारक चित्र बदलायचे असेल तर गावोगावच्या तरुणांनी सावध व्हायल हवे. त्यांनी आपल्या हक्काच्या मैदानांसाठी राजकीय चपला बाहेर ठेवून लढा उभारण्याची गरज आहे. सरकारची वक्रदृष्टी उरण, पेण परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर पडली आहे. त्यामुळे आजही वेळ गेलेली नाही. तरुणांनी गुरचरण जमीन वा त्या अनुषंगिक जमिनीवर मैदाने तयार करावीत. ती अधिकृत करण्यासाठी मी आपल्या मागे खंबीरपणे उभा आहे. कारण आजपर्यंत अनेक गावांना मी मैदाने मिळवून दिलेली आहेत. मी सर्वसामान्यांसाठी लढत आहे, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आपले मत उरण तालुक्यातील कोप्रोली येथे व्यक्त केले. त्यांच्या हस्ते चंद्रशेखर मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ कोप्रोली आयोजित बापूजी देव चषकाचे भव्य उद्घाटन सोमवारी (ता.६) करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 
 
प्रकाशझोतातील टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन 'मी मराठी' मोठी जुईच्या मैदानावर करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ठाकूर, उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, उरण युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश पाटील, अलंकार परदेशी, घनश्याम पाटील, ध्रुव म्हात्रे आणि एमजी ग्रुपचे सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या टेनिस क्रिकेट सामन्यांसाठी चंद्रशेखर ठाकूर, अमेय पितळे, प्रितेश पाटील, अक्षय कोळी, अनिकेत ठाकूर आणि ग्रामस्थांनी मेहनत घेतली आहे. यावेळी उत्कृष्ट सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती