सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • e मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
  • इराण-अमेरिका युद्ध थांबताच शेअर बाजारात सर्वात मोठी उसळी, सेन्सेक्स 2500 अंकांनी वधारला, निफ्टीचा वरच्या दिशेने सुस्साट प्रवास
  • युद्धविराम यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा इस्रायलींना आवर घातलाच पाहिजे; तडकाफडकी राजीनामा दिलेल्या ट्रम्पच्या शिलेदाराचा थेट इशारा
  • पाकिस्तानने जागतिक युद्ध थांबवलं, डोनाल्ड ट्रम्पनी शत्रूराष्ट्राचे आभार मानणे ही मोदींना मारलेली चपराक: संजय राऊत
 विश्लेषण

अमेरिका–इराण तणावाला ब्रेक; दोन आठवड्यांची शस्त्रसंधी जाहीर, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

डिजिटल पुणे    08-04-2026 13:04:01

अमेरिका : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता संघर्ष तात्पुरता थांबवण्यात आला असून दोन्ही देशांनी दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीवर सहमती दर्शवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून याची अधिकृत घोषणा केली.

ट्रम्प यांनी यापूर्वी इराणवर मोठा लष्करी हल्ला करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्या आधीच दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघाला. इराणकडून आलेल्या प्रस्तावातील अटी विचारात घेऊन अमेरिका या तात्पुरत्या युद्धविरामासाठी तयार झाली आहे.

या करारानुसार, दोन्ही देश पुढील दोन आठवड्यांपर्यंत कोणत्याही प्रकारच्या लष्करी कारवाया थांबवणार आहेत. त्याचबरोबर होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्याच्या मुद्द्यावरही सकारात्मक प्रगती झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, पाकिस्तान ने मध्यस्थीची भूमिका बजावत या शस्त्रसंधीत महत्त्वाचे योगदान दिल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करी प्रमुख आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

इराणकडूनही या करारावर सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री यांनी स्पष्ट केले की, अमेरिका हल्ले थांबवत असल्यास इराणही शांतता राखेल.दोन्ही देशांमध्ये दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा दोन आठवड्यांचा कालावधी महत्त्वाचा मानला जात आहे. पुढील चर्चांद्वारे अंतिम करारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती