दिल्ली : दिल्लीमध्ये पार्थ पवार यांनी राज्यसभेच्या खासदार म्हणून शपथ घेत संसदेतील आपला पहिला अधिकृत प्रवेश नोंदवला. या वेळी त्यांच्या कुटुंबीयांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
शपथविधी सोहळ्यात पार्थ पवार यांचा वेगळा लूक विशेष चर्चेत राहिला. त्यांनी परिधान केलेले गुलाबी जॅकेट आणि साधी, क्लासिक स्टाईल ही अनेकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खास व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देणारी ठरली. त्यामुळे त्यांच्या या लूकची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.\पार्थ पवार यांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली. संसदेतील हा त्यांचा पहिलाच कार्यकाळ असल्याने त्यांच्या प्रवेशाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी शरद पवार यांनीही राज्यसभेत काम केलेले आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील वेगवेगळ्या पिढ्यांचे प्रतिनिधित्व आता राष्ट्रीय पातळीवर अधिक ठळकपणे दिसून येत आहे.पार्थ पवार यांच्या या नव्या जबाबदारीमुळे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व संसदेत अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.