पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त “सत्यशोधक विचार आणि एआय च्या जमान्यातील आव्हाने” या विषयावर विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात येणार आहे.या संवादात प्रा. प्रविण चव्हाण आणि साथी सुभाष वारे हे प्रमुख संवादक म्हणून सहभागी होणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सत्यशोधक विचारांची उपयुक्तता आणि सामाजिक परिवर्तनातील त्यांची भूमिका यावर चर्चा केली जाणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले असून, हा कार्यक्रम त्यांच्या सभागृहात पार पडणार आहे. सामाजिक विचार, विज्ञाननिष्ठता आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडवून आणणारा हा संवाद तरुणाईसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.या कार्यक्रमाला विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.