पुणे (कोंढवा) : कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत खंडणी उकळण्याच्या उद्देशाने दहशत निर्माण करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एक गावठी पिस्तूल आणि दुचाकी वाहन जप्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ मार्च २०२६ रोजी कोंढवा परिसरात फिर्यादीकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवत धमकावल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर कोंढवा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिस पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर १० मार्च २०२६ रोजी रात्री सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींकडून गावठी पिस्तूल व दुचाकी जप्त करण्यात आली. जप्त मालाची किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने केली.