नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. आपले जीवन समानता, न्याय आणि शिक्षणाच्या आदर्शांसाठी समर्पित करणारे ते एक द्रष्टे समाजसुधारक होते असे पंतप्रधानांनी सांगितले.
महात्मा फुले हे महिला आणि वंचितांच्या हक्कांच्या रक्षणाचा पुरस्कार करणारे प्रणेते होते आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षण हे सक्षमीकरणाचे एक प्रभावी साधन बनले, असे पंतप्रधान म्हणाले. हे वर्ष या थोर समाजसुधारकाच्या द्विशताब्दी जयंती उत्सवाचा महत्त्वपूर्ण प्रारंभ आहे, असे त्यांनी नमूद केले. या प्रसंगाचे औचित्य साधून पंतप्रधानांनी एक लेख लिहिला आहे, ज्यामध्ये महात्मा फुले हे अनेकांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ कसे आहेत आणि त्यांनी शिक्षण, ज्ञान आणि सर्वांच्या कल्याणावर दिलेला भर आजच्या काळातही किती सुसंगत आहे, यावर आपले विचार मांडले आहेत. मोदी यांनी पुढे अशी प्रार्थना केली की, त्यांचे विचार समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांना सदैव मार्गदर्शन करत राहोत.
एक्सवरील पोस्ट्स च्या मालिकेत पंतप्रधानांनी लिहिलेः
"महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त, समानता, न्याय आणि शिक्षणाच्या आदर्शांसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या एका दूरदृष्टी असलेल्या समाजसुधारकाला मी विनम्र अभिवादन करतो. ते महिला आणि वंचितांच्या हक्कांच्या रक्षणाचा पुरस्कार करणारे प्रणेते होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच शिक्षण हे सक्षमीकरणाचे एक प्रभावी साधन बनले. या वर्षी, आपण त्यांच्या द्विशताब्दी जयंती उत्सवाचा प्रारंभ करत आहोत. त्यांचे विचार सामाजिक प्रगतीसाठी सर्वांना सदैव मार्गदर्शन करत राहोत."
"महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीदिनी, समता, न्याय आणि शिक्षण या मूल्यांसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या या द्रष्ट्या समाजसुधारकाला अभिवादन करतो. महिला आणि उपेक्षितांच्या हक्कांचा लढा सुरु करणारेही तेच होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षण हे सक्षमीकरणाचे एक शक्तिशाली साधन बनले."
"महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती उत्सवाचा प्रारंभ होत असताना, ते कशाप्रकारे अनेकांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत आणि शिक्षण, ज्ञान अन् सर्वांच्या कल्याणावरील त्यांचा भर आजच्या काळातही किती सुसंगत आहे, यावर एका लेखातून विवेचन केले आहे.”
"आपण महात्मा फुले यांच्या जयंतीच्या द्विशताब्दी वर्षात पाऊल ठेवत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ते कशा प्रकारे अनेक लोकांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरले आहेत तसेच त्यांनी शिक्षण, अध्ययन आणि सर्वांच्या कल्याणावर दिलेला भर आजच्या युगातही कसा समर्पक आहे, याबद्दलचे काही विचार लेखणीतून उतरवले"
“महान समाजसुधारक महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या सोहळ्याचा शुभारंभ होत आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन शिक्षण, ज्ञान आणि लोककल्याणासाठी समर्पित केले. आजही ते कशा प्रकारे कोट्यवधी देशवासियांसाठी प्रेरणापुंज बनलेले आहेत, याविषयी या लेखात मी आपले विचार मांडले आहेत.”