सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • संतोष देशमुख केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला, माझ्या खच्चीकरणासाठी प्रयत्न केले गेले; धनंजय देशमुखांचा दावा
  • मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
  • पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
 DIGITAL PUNE NEWS

नारायण राणेंचा राजकीय वारसा सक्षम हातात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नितेश-निलेश राणेंचे कौतुक

डिजिटल पुणे    11-04-2026 15:58:02

सिंधुदुर्ग: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना राणे कुटुंबाच्या राजकीय वारशाचाही विशेष उल्लेख केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

आपल्या भाषणात फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या विधानसभेतील दमदार कामगिरीच्या आठवणी सांगितल्या. विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम प्रभावी होते. सभागृहात त्यांचा दरारा होता आणि त्यांच्या भाषणाची शैली वेगळीच होती, असे त्यांनी नमूद केले.

फडणवीस पुढे म्हणाले की, राजकारणातील आपल्या प्रवासात राणे यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ महत्त्वाचे ठरले. विशेषतः अर्थसंकल्पावरील त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांचा उल्लेख करत त्यांनी राणे यांच्या सखोल ज्ञानाची प्रशंसा केली.

याचबरोबर त्यांनी मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांचेही कौतुक केले. “राणे साहेबांचा वारसा त्यांच्या दोन्ही मुलांनी समर्थपणे पुढे नेला आहे. त्यांना राजकारणाचे योग्य संस्कार मिळाले असून त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे,” असे फडणवीस म्हणाले.कार्यक्रमात उपस्थित नेत्यांनीही नारायण राणे यांच्या राजकीय योगदानाचा गौरव करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


 Give Feedback



 जाहिराती