पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी महाराष्ट्राला महापुरुषांची परंपरा लाभल्याने महाराष्ट्राची देशात पुरोगामी राज्य म्हणून ओळख आहे. आजच्या काळात कठीण वाटणाऱ्या सामाजिक प्रश्नावर महात्मा फुले यांनी काम केले. तेव्हाची सामाजिक परिस्थिती वेगळी होती. न्याय व समतेबरोबरच त्यांनी शिक्षण प्रसाराचे मूलभूत कार्य केले. असे सांगितले.
या प्रसंगी विद्यार्थिनी पूर्वा ताकतोडे, डॉ. वंदना सोनवले, प्रा. रेखा निसाळ, प्रा. निकिता मदने, प्रा. पायल कामठे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी प्राचार्य घोरपडे यांनी पूर्वा ताकतोडे या विद्यार्थिनीच्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल सत्कार केला.या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, प्रा. गजाला सय्यद, डॉ. राहुल नरंगळकर, डॉ. दत्तात्रय टिळेकर, डॉ. विलास वाणी, डॉ. विलास मोरे, डॉ. दत्तात्रय संकपाळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती धोत्रे यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी केले.या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, प्रा. गजाला सय्यद, डॉ. राहुल नरंगळकर, डॉ. दत्तात्रय टिळेकर, डॉ. विलास वाणी, डॉ. विलास मोरे, डॉ. दत्तात्रय संकपाळ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती धोत्रे यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी केले.