सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • संतोष देशमुख केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला, माझ्या खच्चीकरणासाठी प्रयत्न केले गेले; धनंजय देशमुखांचा दावा
  • मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
  • पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
 शहर

परांजपे रस्त्यावर महिनाभरापासून खड्डा उघडाच, नागरिकांनी वेधले लक्ष

डिजिटल पुणे    13-04-2026 10:47:53

पुणे: शहरातील गजबजलेल्या फर्गसन रस्ता ते आपटे रस्त्याला जोडणाऱ्या रँग्लर  परांजपे  रस्त्यावर, (हॉटेल वैशाली कॉर्नरवर) गेल्या महिनाभरापासून रस्त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पादचारी मार्गावरच  भूमिगत वाहिन्या दुरुस्तीसाठी केलेल्या मोठा खड्डा उघडा पडलेला असून त्याभोवती तुटलेल्या फरशा आणि मातीचे ढिगारे दिसत आहेत. या ठिकाणी भूमिगत  वाहिन्यांचे काम सुरू असल्याचे दिसते, मात्र काम अपूर्ण अवस्थेतच सोडण्यात आले आहे.


या भागात दिवसभर मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालक दोघांनाही अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच गंभीर होते.स्थानिक नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर या समस्येकडे लक्ष वेधत प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा कामांकडे दुर्लक्ष होऊ नये, असेही त्यांनी नमूद केले.महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन रस्ता पूर्ववत करण्याची अपेक्षा  व्यक्त होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती