पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सलग अठरा तास वाचन व अभ्यास उपक्रम या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्र, राजकारण, समाजशास्त्र, कायदा, आणि धर्म यांसारख्या विविध विषयांचा सखोल अभ्यास केला. ते आठरा तास अभ्यास करायचे. त्यांच्या अभ्यासू वृत्ती आणि व्यासंगाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. यावेळी जितीन गावित, दिशा नगरे, सुप्रिया पोळ, सृष्टी मोरे, विद्या रांजणे, देविका देडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.


या उपक्रमात ५१ विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले.या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, डॉ. विलास मोरे, डॉ. दत्तात्रय संकपाळ, प्रा. अनिल देवकाते आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वंदना सोनवले यांनी केले तर आभार डॉ. दत्तात्रय संकपाळ यांनी मानले.