सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • संजूच्या जिद्दीचा विजय; आयसीसी 'प्लेयर ऑफ द मंथ' किताबावर आता सॅमसनचंच नाव, रचला इतिहास
  • मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
 शहर

डॉ. आंबेडकर जयंती निमित्त आझम कॅम्पसची अभिवादन मिरवणूक; मिरवणुकी द्वारे आझम कॅम्पस चे महामानवाला अभिवादन !

डिजिटल पुणे    14-04-2026 15:24:38

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस)च्या वतीने भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त  अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. दि.१४ एप्रिल २०२६   रोजी सकाळी साडे आठ  वाजता आझम कँपस येथून ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष आबेदा इनामदार  यांच्या हस्ते  या मिरवणुकीला प्रारंभ झाला.महात्मा गांधी रस्त्यावरील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात  आले.

संस्थेचे सचिव प्रा .इरफान शेख ,डॉ.एन.वाय , काझी ,इफ्तेकार इनामदार ,अफजल खान, मशकुर शेख, अब्दुल वहाब शेख,महंमद गौस सय्यद,आरिफ सय्यद,धनंजय पाळणे ,प्रवेश कुमार , शब्बीर शेख , इरफान खान ,मुश्ताक पटेल,विश्वस्त, मुख्याध्यापक , प्राचार्य ,पदाधिकारी, कर्मचारी ,विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच अवामी महाज सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले.अल्पसंख्य समुदायातील विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय होते.

दरवर्षी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. हजारो विद्यार्थी  त्यात सहभागी होतात.त्यातून महामानवांचे सामाजिक ,शैक्षणिक संदेशांचा  प्रसार केला जातो.

 


 Give Feedback



 जाहिराती