सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • संजूच्या जिद्दीचा विजय; आयसीसी 'प्लेयर ऑफ द मंथ' किताबावर आता सॅमसनचंच नाव, रचला इतिहास
  • मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
 विश्लेषण

अकलूजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी;भव्य उपस्थितीत अकलूजमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन

डिजिटल पुणे    15-04-2026 10:36:59

अकलूज  : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

अकलूजच्या आझादचौकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्ताने माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी आ.रणजितसिंह मोहिते पाटील,खा.धैर्यशील मोहिते पाटील, नगराध्यक्षा रेश्मा अडगळे,उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, नगरसेवक क्रांतीसिंह माने पाटील,विशाल मोरे,नासिक सोनवणे,विलास क्षिरसागर,सचिन देशमुख,नामदेव गलांडे,मोहसीन शेख,मिलिंद कोतमिरे,योगेश गांधी, मृदुला सुर्यवंशी,प्रियंका गायकवाड,रेश्मा तांबोळी, प्रतिभा गायकवाड,मनिषा तिकोटे,शितल बंदपट्टे,नम्रता जगताप,वैशाली भोसले,मंदाकिनी पाडोळे,उज्वला विटकर,माजी सरपंच विठ्ठलराव गायकवाड, दादासाहेब मोरे,किरण धाईंजे,सुशांत गायकवाड,दादा तांबोळी,डॉ.अमोल माने,विशाल फुले,मोहन तिकोटे आदीसह बाबासाहेबांचे अनुयायी बहुसंख्येने उपस्थित होते.

अकलूज शहर मुस्लिम समाजाच्यावतीने नाजीम खान इम्रान मोहोळकर,साहील बागवान.अब्रार मोहोळकर, इसाक बागवान,नंदकुमार सोनवणे,हरीभाऊ मोरे आदी सह मुस्लिम समाज बांधवांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.अकलुज परीसर धनगर समाज उन्नती मंडळाच्या वतीने दिलीप होनमाने,लक्ष्मीकांत वाघे,निलेश ठोंबरे, परशुराम माने,कुणाल होनमाने,प्रा.अमोल बंडगर,राजु गोरे यांच्यासह धनगर समाज बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आ. राम सातपुते यांच्यासह शहराध्यक्ष महादेव कावळे, नगरसेवक राहुल लोंढे,महेश शिंदे,जयश्री एकतपुरे, दिपाली वाघमोडे,विक्रांत देशमाने,अक्षय वाईकर,बाबा गायकवाड,अशोकराव गायकवाड,सुशांत शिंदे,महावीर खंडागळे,भैय्या चंदनशिवे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


 Give Feedback



 जाहिराती